शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्गनगरी नगरपंचायत स्थापनेचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 15:54 IST

सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत स्थापना लवकर करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. हा ठराव लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्राधिकरण कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला.

ठळक मुद्देनवनगर विकास प्राधिकरण समितीच्या सभेत एकमतआराखडा तयार करण्याची मागणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीच्या बुधवारी झालेल्या सभेत सिंधुदुर्गनगरी नगर पंचायत स्थापना लवकर करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. हा ठराव लवकरात लवकर कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्राधिकरण कार्यक्षेत्रात नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्यात यावा, असा ठराव घेण्यात आला.जिल्हाधिकारी तथा प्राधिकरण समिती अध्यक्ष डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी समिती सचिव तथा अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा परिषद तसेच जिल्हा पोलीस व विविध विभागांचे अधिकारी तसेच अशासकीय सदस्य प्रभाकर सावंत व छोटू पारकर उपस्थित होते. बैठकीनंतर सदस्य सावंत व पारकर यांनी याबाबत माहिती दिली.यावेळी बोलताना सावंत व पारकर यांनी, प्राधिकरण क्षेत्रातील वस्ती वाढली आहे. त्यामुळे येथे अधिकाधिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी ग्रामस्थांची मागणी असून विरंगुळा केंद्र सुरू करण्याचीही मागणी होती. त्यानुसार विरंगुळा केंद्र उभारण्याचे निश्चित करून त्यासाठी आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. तसेच प्राधिकरण क्षेत्रात सुसज्ज बाजारपेठ नाही. लोकांना खरेदीसाठी शहराबाहेर जावे लागते.

यासाठी प्राधिकरण क्षेत्रात व्यापारी संकुल उभारण्याची मागणी पूर्वीपासून होत होती. व्यापारी संकुलाच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली असून लवकरच व्यापारी संकुल उभारण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी स्पष्ट केले.सध्या आठवड्यातून एकदा कचरा उचलला जातो. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. नवीन वाहने आल्यावर सुका व ओला कचरा असे वर्गीकरण करून कचरा उचलण्याचा निर्णय यावेळी झाला. ओरोस फाटा येथील सिंधुदुर्गनगरी प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. रस्त्यांना दुभाजक बसविणे, प्राधिकरण क्षेत्रातील सर्कलचे सुशोभिकरण करणे, स्टॉलधारकांचे पुनर्वसन करणे आदी विषयांवर यावेळी चर्चाझाल्याचे सावंत आणि पारकर यांनी सांगितले.अजून दोन आधुनिक गाड्या खरेदीचा निर्णयसिंधुदुर्गनगरीसाठी राज्य शासनाकडून माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी २५ कोटी रुपये मंजूर केले. या निधीतून रस्ते विकासकामे सुरू आहेत. याचबरोबर पथदिवे बसविणे, भूखंड १0३ व ४६ भागासाठी विद्युत ट्रान्सफार्मर मंजुरीची मागणी केली आहे. कचरा उचलण्यासाठी अजून दोन अत्याधुनिक गाड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग