शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:44 IST

देवगड आगाराची सुरू असलेली देवगड-नांदगांव रेल्वेस्टेशन ही फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला.

ठळक मुद्देदेवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना इशारादेवगड-नांदगांव फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडा, अन्यथा आंदोलन करणार

देवगड : देवगड आगाराची सुरू असलेली देवगड-नांदगांव रेल्वेस्टेशन ही फेरी रेल्वे प्रवाशांना घेऊनच सोडावी. अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करावे लागेल, असा इशारा देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापकांना देण्यात आला.देवगड तालुका मनसेच्यावतीने आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये देवगड आगारातून दुपारी सुटणारी देवगड-नांदगांव ही फेरी नांदगांव रेल्वे स्टेशनवर दिवा पॅसेंजर रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांना न घेता रिकामी देवगडला येते. त्यामुळे तेथील प्रवाशांना नांदगांव तिठ्यापर्यंत येण्यासाठी ४० ते ५० रूपये खासगी वाहनाला नाहक मोजावे लागत असून प्रवाशांना आर्थिक भुर्दंड पडत आहे.आंगणेवाडी व कुणकेश्वर यात्रा सुरू होत असून कोकणात यात्रांसाठी बरेच भाविक प्रवासी येणार आहेत. त्या प्रवाशांचे आर्थिक नुकसान व वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी प्रवाशांना घेऊनच एसटी रेल्वेस्थानकावरून सोडावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी आगार व्यवस्थापक हरेश चव्हाण यांनी या फेरीचे सकाळपासून सुरू असलेल्या शेड्युलचे नियोजन करून नांदगांव रेल्वेस्टेशन ही बस प्रवाशांना घेऊनच सोडण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष महेश नलावडे, सचिव जगदीश जाधव, विभाग अध्यक्ष अभिजीत तेली, उपविभाग अध्यक्ष देवेंद्र करंगुटकर, वैभव परब, चेतन नलावडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :MNSमनसेsindhudurgसिंधुदुर्गstate transportएसटी