शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:43 IST

ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देवाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली रेस्क्यू टिमच्या सदस्यांचे सर्वत्र कौतुक

आंबोली : ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.जिल्हा परिषदेचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी प्राणीमित्र काका भिसे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी वेळ न दवडता त्वरित त्या कुत्र्याचा शोध घेतला.पहिल्या दिवशी तो कुत्रा आढळला नाही. दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांसह पुन्हा त्यांनी शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, डॉ. प्रसाद धुमक, महेश राऊळ, नंदू कुपकर, सिद्धेश ठाकूर, दीपक दुतोंडकर आदी या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.जवळपास चार तास शोधमोहीम राबविल्यावर त्यांना तो कुत्रा कचरा डेपो येथे आढळून आला. त्यांनी त्या कुत्र्याला पकडले व त्याच्या डोक्यातील ती बरणी कटरच्या सहाय्याने कापून काढली. कुत्र्याच्या डोक्यात बरणी बरेच दिवस असल्याचे लक्षात आले. कारण कुत्रा अशक्त झाला होता. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अनिल गावडे यांनी त्या कुत्र्यावर उपचार करून पुन्हा त्याला सुरक्षितरित्या सोडून दिले. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग