शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य मंत्र्यांकडील 'त्या' खासगी ओएसडींना मंत्रालयातून दूर करा, परशुराम उपरकर यांची मुख्य सचिवांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:05 IST

कणकवली: मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता हे 'खासगी ओएसडी' म्हणून नियुक्त आहेत. माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीत ते ...

कणकवली: मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता हे 'खासगी ओएसडी' म्हणून नियुक्त आहेत. माहितीच्या अधिकारात घेतलेल्या माहितीत ते 'अधिकृत ओएसडी' नसल्याची माहिती संबधित खात्याकडून देण्यात आली आहे. मात्र, मंत्रालयातून ते 'ओएसडी' म्हणून फोन लावून जिल्ह्यातील  अनेक अधिकाऱ्यांना आदेश देत आहेत. तरी त्यांना मंत्रालयातून दूर करण्यात यावे, अशी लेखी मागणी माजी आमदार परशुराम उपरकर यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबतच्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर भ्रष्टाचाराला आळा घालावा म्हणून मंत्र्यांचे पिएस( PS), पिए (PA) व मंत्र्यांचे ओसडी( OSD) आपल्या देखरेखीखाली नेमले जाणार आणि त्यांची व त्या असलेल्या अधिकाऱ्यांची सर्व तपासणी करून नेमणुका केल्या जाणार, अशा प्रकारच्या बातम्या दूरचित्रवाणी व वृत्तपत्रातून आलेल्या आहेत. असे असताना मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे यांच्याकडे एक सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता खासगी ओएसडी (OSD) म्हणून काम पाहत आहेत. त्यांना मत्स्योद्योग मंत्र्यांच्या कार्यालयात वातानुकूलित  केबिन व वाहन दिलेले आहे. त्यांच्याबाबत अनेक प्रकारच्या तक्रारी प्रलंबित आहेत. त्याबाबत न्यायालयात व लोकआयुक्तांकडे निवाडे सुरू आहेत. असे असताना खासगी ओएसडी (OSD) म्हणून ते आपल्या होणाऱ्या चौकशीबाबत संबंधितांवर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यांची चौकशी शासनस्तरावर एप्रिल २०२३ पासून प्रलंबित आहे. ३१ मार्चला ते निवृत्त होऊनही त्या पूर्ण झालेल्या नाहीत. असे खासगी ओएसडी मंत्रालयात वावरत असून थेट अधिकाऱ्यांना फोन करत आहेत.तसेच जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना फोन लावून विविध कामे सांगत असून त्यांच्या काळात जी कामे झाली आहेत, त्या कामांबद्दल विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन करून सूचना करतात. तसेच पालकमंत्र्यांच्या बैठकांना उपस्थित असल्याची त्यांची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये छापून आली आहेत.ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तीन ते चार महिन्यातच मंत्र्यांकडे ओएसडी म्हणून कार्यरत झाल्याने ते शासकीय अधिकारी असल्याचे भासवून फोन लावून आदेश देतात. तरी त्यांना मंत्रालयातून दूर करण्यात यावे, असेही परशुराम उपरकर यांनी या पत्रात म्हटले आहे.