शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 16:06 IST

रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. रोजगार उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने होणाऱ्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.

ठळक मुद्देरिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे धरणेकोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार; आंदोलनकर्ते आक्रमक

सिंधुदुर्गनगरी : रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यातच व्हावा यासाठी कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्हा दौरा पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी धरणे आंदोलन केले. रोजगार उपलब्ध होणे ही चांगली बाब आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्याने होणाऱ्या कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.राजापूर तालुक्यातील नाणार गावात रिफायनरी प्रकल्प उभारणार असल्याचे तत्कालीन फडणवीस सरकारने जाहीर केले होते. या प्रकल्पाला सत्तेत असूनही शिवसेनेने विरोध केला होता. या विरोधामुळे अखेर तो प्रकल्प रद्द करण्याची वेळ फडणवीस सरकारवर आली होती. दरम्यान, नाणारवासीयांचा विरोध असल्याने शिवसेनेचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेनेचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध नाही, तर या उद्योगाला जे जमीन मालक जागा देतील तेथे हा प्रकल्प उभारला जाईल अशी भूमिका शिवसेनेने अलीकडच्या काळात जाहीर केली होती.रिफायनरीच्या समर्थनार्थ २० जुलै २०१९ रोजी रत्नागिरीत मोर्चा काढण्यात आला होता. तर सद्यस्थितीत रिफायनरीसाठी सशर्त जमीन देण्यासाठीची लेखी संमतीपत्रे गोळा झाली आहेत. ७६.३६ एकर जमीन मिळण्याची शक्यता आहे. कोणताही दर जाहीर न होता एवढ्या मोठ्या प्रमाणात संमती मिळणे ही कोकणमधील एक अद्भुत क्रांतीच असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.कोकण जनकल्याण प्रतिष्ठान राजापूर या संघटनेच्या झेंड्याखाली बसलेल्या सर्व आंदोलकांच्या गळ्यात शिवसेनेचे नाव व धनुष्य बाणाचे चिन्ह असलेले भगवे शेले होते. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेविरोधात आता शिवसैनिकच रिफायनरीच्या समर्थनार्थ रणांगणात उतरल्याचे चित्र आहे. कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यांच्या नेतृवाखालील या लक्षवेधी आंदोलनात अनेक शिवसैनिक सामील झाले होते. 

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्ग