शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आंबोली थंडीने गारठली, पारा आठ अंश सेल्सिअस पेक्षाही खाली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 25, 2024 15:54 IST

आंबोली ( सिंधुदुर्ग ) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या ...

आंबोली (सिंधुदुर्ग) : महाराष्ट्रातील चेरापूंजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आंबाेली हिल स्टेशनला कडाक्याच्या थंडीने गारठून टाकले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वांत निचांकी तापमानाची नोंद गुरुवारी आंबोलीत झाली असून पारा तब्बल आठ अंशांपर्यंत खाली घसरला आहे. त्यामुळे नेहमीच गुलाबी थंडीची प्रतीक्षा असणाऱ्यांनी आंबोलीत वास्तव्यास यावे, असे वातावरण निर्माण झाले आहे.उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तिन्ही ऋतू अनुभवायचे असल्यास दक्षिण कोकणातील सर्वांत महत्त्वाचे ठिकाण म्हणून आंबोली हिल स्टेशनकडे पाहिले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक आंबोलीत या तिन्ही हंगामाचा आस्वाद घेत असतात.आंबोलीत साधारपणे सप्टेंबर महिन्यापासूनच थंडीचा हंगाम सुरू होतो. यावर्षी मात्र पूर्ण थंडीचा हंगाम विना थंडी गेला होता. हिवाळी हंगामाच्या सरते शेवटी आंबोलीमध्ये कडाक्याची थंडी पडत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये आंबोलीमध्ये पारा आठ अंश सेल्सिअसच्या खाली गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी आलेले पर्यटक सुखावले आहेत.आंबा बागायतदार सुखावलाही थंडी संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये पडत असून कडाक्याच्या थंडीमुळे आंबा बागायतदार सुखावले आहेत. कारण जर थंडी नसेल तर आंब्यांला मोहर येत नाही. या चिंतेने ग्रासलेल्या आंबा बागायतदारांनासुद्धा आता दिलासा मिळाला आहे.

आंबोलीत स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमनपक्षी वैभवसुद्धा थंडीच्या प्रतीक्षेत असते, कारण पक्ष्यांना थंडी आवडते. त्यामुळे स्थलांतर पक्षी व स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आंबोलीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आंबोलीत पडत असलेल्या थंडीने संपूर्ण निसर्ग सृष्टी आनंदित झाली आहे. पर्यटकही या थंडीचा आस्वाद घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गweatherहवामान