शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

रत्नागिरी : उष्मा वाढल्याने विजेची अधिक मागणी

By admin | Updated: September 20, 2014 00:34 IST

कमी पाऊस : १३ हजार ६०७ मेगावॅट मागणीची नोंद- दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासा

रत्नागिरी : गेले दहा बारा दिवस पावसाने उघडीप घेतली आहे. कडकडीत ऊन पडत असल्याने उकाडा वाढला आहे. परिणामी राज्यात विजेची मागणी वाढली आहे. शुक्रवारी दुपारी १३ हजार ६०७ मेगावॅट इतकी विजेची मागणी नोंदविण्यात आली होती.गणेशोत्सव कालावधीत पाऊस बऱ्यापैकी कोसळत असल्यामुळे साडेदहा हजार ते अकरा हजार मेगावॅट इतकी विजेची मागणी करण्यात आली होती. कोळशाचा तुटवडा जाणवत असल्याने वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. मात्र औष्णिक जलविद्युत, गॅस, खासगी प्रकल्पातून उत्पादित विजेतून ग्राहकांना मागणीप्रमाणे वीजपुरवठा करण्यात येत आहे. ऐन उन्हाळ्यात (एप्रिल-मे) १४ ते १५ हजार मेगावॅट इतकी विजेची सर्वोत्तम मागणी नोंदविण्यात आली होती. सध्या जलविद्युत प्रकल्पातील निर्मिती संच देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेत. एखाददुसऱ्या संचाव्दारे वीजनिर्मीती करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून ५ हजार ५४३ मेगावॅट वीज आयात करण्यात येत आहे. औष्णिक प्रकल्पाव्दारे ४ हजार ३८७ मेगावॅट, कोयना जलविद्युत प्रकल्पातून ८०० मेगावॅट, उरण गॅस प्रकल्पातूल ४७६ मेगावॅट तर खासगी (जिंदाल, अदानी, आयडियल) प्रकल्पातून ३ हजार ५६० मेगावॅट विजेचा पुरवठा होत असल्याने ग्राहकांना वीजेचा पुरवठा करण्यात येत आहे.दसऱ्यापर्यत पाऊस पडतो. परंतु तरीही प्रमाण मात्र कमी होत चालले आहे. हवामानातील बदलामुळे विजेची मागणी भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. कोळसानिर्मिती प्रकल्पास जर कोळसा पुरवठा वेळेवर न झाल्यास भारनियमनाचा धोका आहे. गणेशोत्सव संपून २० ते २२ दिवस झाले असले तरी २० दिवसात दोन ते अडीच हजार मेगावॅट इतकी मागणी वाढली आहे. हवामान कोरडे राहिले तर यापुढे वीजेची मागणी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालल्याने वीज टंचाई भासणार आहे.(प्रतिनिधी)पावसाने दडी मारली वीजेची मागणी वाढलीयंदा दसऱ्याआधी पाऊस कमी देखभाल दुरूस्तीसाठी बंद आहेतजलविद्युत केंद्रातील निर्मिती संचअपवाद एखाद दुसऱ्या संचाचा वीजपुरवठा अधिक कसा होईल यासाठी आता प्रयत्नसर्व प्रकल्पातील उत्पादीत वीजेतून होतोय वीज पुरवठा दरवाढीचा महानगरपालिका क्षेत्रास फटका; कोकण परिमंडलास दिलासारत्नागिरी : विजेची मागणी वाढल्यानंतर केंद्र शासनाकडून विज आयात करावी लागते. महावितरणच्या धोरणानुसार ही रक्कम कर स्वरूपात असल्याने नियमानुसार ती स्थानिक ग्राहकांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त दरवाढ म्हणून महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांच्या बिलातून रक्कम वसूल केली जाणार आहे. कोकण परिमंडलात महापालिका नसल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. महानगरपालिका हद्दीत एलबीटी कर लागू करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने स्थानिक कर महावितरणला आकारला होता. हा कर तेथील ग्राहकांकडून नियमित वसूल करून स्थानिक संस्थेला देण्यात येणार आहे. त्यामुळे महानगरपालिका क्षेत्रातील ग्राहकांकडून करवसूली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद महानगरपालिकेस विजेवर २१.६८ कोटी रूपये भरण्यास महावितरणला आदेश देण्यात आले आहे. संबंधित रक्कम किती महिन्यात वसूल करायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र एका महिन्यात ही रक्कम वसूल केल्यास प्रतियुनिट २.२५ रू. असा भार ग्राहकांवर येईल. जर काही महिन्यात रक्कम वसूल करायचे ठरल्यास व महानगरपालिकेने व्याज आकारल्यास त्यानुसार यात बदल होणार आहेत. कोकण परिमंडलात रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात महापालिका नसल्यामुळे येथील ग्राहकांना संबंधित करातून दिलासा मिळाला आहे. परंतु औरंगाबादप्रमाणे नागपूर तसेच अन्य महापालिका हद्दीतील ग्राहकांना कराचा भूर्दंड बसणार आहे. कोकण परिमंडलास महापालिका नसल्याचा दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)