शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील रेशनिंग दुकानदारांचा दिल्लीत जंतर-मंतरवर घुमला आवाज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 12:39 IST

देशभरातील रेशनिंग व केरोसीन परवानाधारक दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत

सुधीर राणेकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेशन दुकानदार व केरोसीन परवानाधारकांनी आज, बुधवारी दिल्ली येथे जंतर-मंतरवर देशव्यापी आंदोलनात आवाज उमटवला. तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर आंदोलन केल्यानंतर देखील रेशनिंग दुकानदारांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने जिल्ह्यातील रेशनिंग दुकानदार देशव्यापी आंदोलनात सहभागी झाले आहेत.रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारने फक्त कमीशनमध्ये २० रूपये व विशेष दर्जा प्राप्त राज्यांसाठी ३७ रूपये कमीशनमध्ये वाढ केली. ही केलेली वाढ समाधानकारक नसून सर्व राज्यातल्या प्रतिनिधींनी या केलेल्या वाढीला आपला विरोध दर्शविलेला आहे.देश पातळीवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत  कोरोना महामारीच्या काळात देशपातळीवरील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता धान्याचे अविरत वाटप केले. मात्र, याची दखल सरकारने न घेता, परवानाधारकांना कोरोना योद्धा घोषीत न करता, कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या परिवाराला कोणताही मोबदला दिला नाही. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे गठीत केलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम  अंतर्गत त्यांच्या अहवालावर ४४०रुपये कमीशन प्रति क्विंटल देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर भारत सरकारद्वारा टोलवाटोलवी करण्यात येत आहे.या सर्व बाबी लक्षात घेता ८ जून २०२२ रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये देश पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना द्वारा सर्व परवानाधारकांना वर्ल्ड फुड प्रोग्राम अंतर्गत ४४० रूपये प्रति क्विंटल कमीशन देण्यात यावे . किंवा दरमहा ५०,००० निश्चित मानधन घोषित करावे. फक्त गहू , तांदूळ अंत्योदय कार्डधारकांना साखर या खाद्य पदार्थावर १ किलो प्रति क्विंटल हॅण्डलिंग लॉस ( तूट ) देण्यावर सर्व राज्यांनी तत्काळ निर्णय घेण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. सर्व राज्यातील स्वस्त धान्य दुकानांबर गहू, तांदुळ व्यतिरिक्त खाद्यतेल व डाळी दरमहा देण्यात याव्यात. आदी मागण्या या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या. देशभरातील रेशनिंग व केरोसीन परवानाधारक दुकानदार या आंदोलनात सहभागी झाले आहेत.सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रेशनिंग दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रुपेश पेडणेकर, कणकवली तालुकाध्यक्ष किशोर नारकर, सचिव सुदर्शन फोपे, बबन लोकरे, राजीव पाटकर, नितीन मुद्राळे, कान्होबा देसाई (मालवण), संजय मुळीक‌ (सावंतवाडी), शैलेंद्र कुळकर्णी, मनोहर राणे, विनय केळकर, प्रदीप पारकर (देवगड),  तात्या हाडये (वेंगुर्ले) आदी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र सदन मधील बैठकीला देखील या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग