शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत शास्त्रीय संगीत महोत्सवात रसिक मंत्रमुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:28 IST

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.

ठळक मुद्देपं . रघुनंदन पणशीकरांसह मनोज मेस्त्री यांचेही गायन अर्जुन पटवर्धन यांचे सतारवादन ठरले लक्षवेधी

सुधीर राणे

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित २२ व्या पं. जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसेंदिवस अभिजात संगीत रसिकांच्या दुष्टीने समृद्ध होत असलेल्या या महोत्सवाची उंची आणखीनच वाढत आहे . रविवारी पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात रसिक अगदी मंत्रमुग्ध झाले. तर कणकवलीतील तरुण, उमदे शास्त्रीय गायक मनोज मेस्त्री यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी दाद दिली.सिंधुदुर्ग जिल्ह्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कणकवली शहरात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने बॅ. नाथ पै एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाट्यमहोत्सवाबरोबरच गेली बाविस वर्षे शास्त्रीय संगीत महोत्सव आणि त्या अंतर्गत आयोजित केल्या जाणाऱ्या शास्त्रीय संगीत कार्यशाळेच्या माध्यमातून अभिजात संगीत रसिकांना संगीताच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात या संस्थेला चांगले यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे रसिकांची येथील कार्यक्रमांना येण्याची ओढ वाढत आहे.यापूर्वी या शास्त्रीय संगीत महोत्सवात पं. सत्यशील देशपांडे , अलकाताई मारुलकर , पं. शौनक अभिषेकी , पं. कैवल्यकुमार गुरव , पं. संजीव अभ्यंकर , तालयोगी सुरेश तळवलकर , पं . राजाभाऊ काळे , कलापिनी कोमकली अशा दिग्गजांनी हजेरी लावली . तसेच हा महोत्सव आपल्या गायन, वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवला . त्याच उंचीचा प्रत्यय यावर्षीही या संगीत महोत्सवात पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने आला . रात्री उशिरापर्यंत चाललेल्या पं. पणशीकर यांच्या संगीत मैफिलीला रसिकांनी दाद दिली. तसेच रसिकांनी आपलीही गाण्याची समज गेल्या बावीस वर्षांत वाढली असल्याचा प्रत्यय यावेळी दिला.पं. रघुनंदन पणशीकर यांनी 'यमन' रागातील विलंबित तीन तालामध्ये ' मोहन मन' हा बडा ख्याल , त्यानंतर ' सखी येरी आली ' ही द्रुत तीन तालातील बंदिश सादर केली . त्यानंतर नायकी कानडा पारामामध्ये रुपक तालातील मेरो पिया ही बंदिश सादर केली.रसिकाग्रहास्तव ' मत्स्यगँधा ' नाटकातील ' गुंतता ह्रदय हे ' नाट्यपद सादर केले . तसेच रसिकांच्या मागणीनुसार किशोरी आमोणकर यानी अजरामर केलेली ' अवघा रंग एक झाला ' ही भैरवी त्यांनी सादर करून संगीत महोत्सवाचा समारोप केला . त्यांच्या मैफिलीला तबला साथ चारुदत्त फडके , हार्मोनियम साथ उदय कुलकर्णी व तानपुरा साथ पल्लवी पिळणकर , रविराज काळे यांनी केली .प्रारंभी वसंतराव आचरेकर प्रतिष्ठानच्या पं . जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्रातील पं . समीर दुबळे यांचे विद्यार्थी असलेल्या मनोज मेस्त्रींचे शास्त्रीय गायन झाले . मनोज मेस्त्री हे कणकवलीतीलच असून त्यांच्या संगीत मैफिलीला कलारसिकानी उत्स्फूर्त दाद दिली . राग ' मधुवंती ' मधील विलंबित 'झुमरा ' तालातील ह्ल ए हो मोरे सईया ' हा बडा ख्याल गाऊन द्रुत तालातील 'सूनप्रिया अर्ज ' सादर केली .

त्यानंतर खमाज रागातील ' ना मानूंगी ' बंदिश - ठुमरी सादर केली . उस्ताद साईज परवेज यांचे शिष्य अर्जुन पटवर्धन यांनी सतारवादनात 'राजश्री ' रागातील रुपक तालात व द्रूत एकतालातील रचना सादर केली . त्यामुळे या संगीत महोत्सवाची रंगत आणखीनच वाढली. सूत्रसंचालन प्रा . डॉ . अनिल फराकटे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. समीर नवरे यांनी केले. यावेळी पं. समीर दुबळे यांच्यासह अन्य संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ उपस्थित होते. 

टॅग्स :musicसंगीतsindhudurgसिंधुदुर्ग