शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुरळ-कोठारवाडीतील घटना : खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजी, शेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 12:07 IST

पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.

ठळक मुद्देपुरळ-कोठारवाडीतील घटना खारभूमी बंधारा कामाबाबत नाराजीशेतीत पाणी गेल्याने जमीन नापीक

देवगड : पुरळ-कोठारवाडी येथील खारभूमी बंधाऱ्याचे मजबुतीकरणाचे काम करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधून पाणी अडवणे गरजेचे असतांना बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यात आली. यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडून झालेले नुकसान खारबंधारा विभागाकडून मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे.पुरळ-कोठारवाडीतील खारभूमी बंधारा मजबुतीकरण कामासाठी जलसंधारण विस्तार व सुधारणा योजनेअंतर्गत ९ लाख ९२ हजार ६७५ रुपये निधी मंजूर झाला आहे. यामुळे या कामाला सुरूवात केली गेली. परंतु असलेल्या बंधाऱ्यांलाच बाजूने भर घालून हे काम सुरू केले गेले.

आधी पाणी अडवणे गरजेचे असतांना पर्यायी बंधारा न बांधताच कामाला सुरूवात करण्यात आली व यावेळी सदर बंधाऱ्यांची झडपे काढली गेली असल्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात पाणी शेतजमिनीत शिरून जमीन नापीक झाली आहे.

एकदा जमिनीत खारे पाणी शिरले तर तीन वर्षे पीक घेता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. हे नुकसान संबंधितांनी भरून द्यावे अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. यावेळी प्रदिप खर्से, बाळू दुदवडकर, सलीम चौगुले, मिलिंद बोंबडी, विपुल आंबेरकर, समीर पुरळकर उपस्थित होते.नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणीखारबंधाऱ्यांचे काम बंद पाडण्यात आले असता पुन्हा दोन दिवसांत हे काम त्याच पध्दतीने सुरू केल्याने शेतकऱ्यांनी काम करण्यास विरोध केला. संबधित बंधाऱ्यांच्या कामाच्या ठिकाणी खारबंधाऱ्यांचे अधिकारी हजर नसल्याने प्रदिप खर्से यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

कामाचे कॉन्ट्रक्टर निखिल घेवारे यांनी बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी पर्यायी बंधारा बांधणे व नंतर काम सुरू करणे गरजेचे होते. या कामाची वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात यावी व झालेल्या नुकसानीबाबत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी प्रदिप खर्से तसेच अन्य शेतकऱ्यांनी केली आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गJalyukt Shivarजलयुक्त शिवार