शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

Sindhudurg: खारेपाटण येथे आढळली दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन जातीची गिधाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:00 IST

खारेपाटण : खारेपाटण येथे दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरित गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट ...

खारेपाटण : खारेपाटण येथे दुर्मीळ युरेशियन ग्रिफॉन प्रजातीची स्थलांतरित गिधाडे विहार करत असल्याचे निदर्शनास आले आहे. खारेपाटण मच्छी मार्केट परिसरात ही गिधाडे आढळून आली.खारेपाटण गावामध्ये सुख नदीच्या काठावर मच्छी मार्केट परिसरात कुक्कुटपालनातील कचरा आणि मासळीचे उरलेले अवयव उघड्यावर टाकले जातात. त्यावेळी घार, बगळे, कावळे घिरट्या घालत असतात. याचदरम्यान उंचावरून आलेल्या या गिधाड्यांच्या मागे कावळे लागले होते. त्यातील दोन गिधाडे इमारतीच्या छतावर उतरल्याचे स्थानिकांनी सांगितले. छायाचित्रकार रमेश जामसांडेकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन त्यातील एका गिधाडाचे छायाचित्र टिपले. त्यानंतर हे गिधाड सुख नदीच्या पलीकडील डोंगराच्या दिशेने उडत गेले.सोशल मीडियावर या गिधाडाचे फोटो टाकून पक्षी वन्यजीव गिधाड की घार यांची विचारणा करण्यात आली. मुंबईतील पर्यावरण वन्यजीव म्हणून कार्यरत असलेले प्रतिनिधी अभ्यासक अक्षय मांडवकर यांनी फोटोग्राफ मागून घेतले. अखेर युरेशियन ग्रिफॉन गिधाड असल्याचे सांगितले.कोकणामध्ये गिधाडांची मोठी संख्या रायगड जिल्ह्यात दिसून येते. कोकणातील म्हासाळा आणि श्रीवर्धन तालुक्यात गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. प्रामुख्याने या ठिकाणी पांढऱ्या पाठीच्या आणि लांब चोचीच्या गिधाडांचा कायमस्वरूपी अधिवास आहे. शिवाय स्थलांतर करून येणाऱ्या हिमालयीन ग्रिफॉन, युरेशियन ग्रिफॉन आणि काळ्या गिधाडांची नोंद आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, खारेपाटणमध्ये दिसलेले गिधाड हे युरेशियन ग्रिफॉन प्रजातीचे निमवयस्कर आहे.स्थलांतरादरम्यान आल्याची शक्यतायुरेशियन ग्रिफॉन गिधाडे प्रामुख्याने भारतापर्यंतच्या मध्य प्रदेशांमध्ये क्वचितच आढळतात. खारेपाटणमध्ये आढळलेले गिधाडे ही स्थलांतरादरम्यानच या ठिकाणी आली असावीत, अशी शक्यता वर्तविण्यात आली. पश्चिम घाट कोकण परिसरात रायगड आणि सिंधुदुर्गातील तिलारी प्रदेशात युरेशियन गिधाड स्थलांतर करून येत असल्याच्या तुरळक नोंदी आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग