शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गातील रंगीत तालीम आली अंगलट, आपत्ती व्यवस्थापनांची होणार चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 23:47 IST

आपत्ती व्यवस्थापन विभागाने सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेली स्फोटांची रंगीत तालीम आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगलट आली आहे.

सावंतवाडी : आपत्ती व्यवस्थापन विभागाने सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेली स्फोटांची रंगीत तालीम आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगलट आली आहे. या रंगीत तालमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले अनेक जण घाबरून पळताना जखमी झाले. त्यामुळे ही रंगती तालीम प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे. आता या सर्व प्रकारांची कोकण आयुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. तसे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.गुरुवारी सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाकडून रंगीत तालीम घेऊन अधिकारी तसेच संबधित यंत्रणा किती सजग आहेत. यांची चाचणी घेण्याचे ठरवण्यात आले होते. यांची माहिती कोणालाच नव्हती. ठरल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाने ही रंगती तालीम घेतली. मात्र यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वृद्ध दिव्यांग तसेच गरोदर माता आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्फोट झाला हे कळाल्याने हे सर्वजण पळून जाऊ लागले. त्यात अनेक जण खाली कोसळले. सगळीकडेच धावाधाव झाली आणि कोणालाच काही समजले नाही.हा सर्व प्रकार सुरू असतानाच कुडाळ तालुक्यातील सरबळ येथील एकनाथ कदम हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनाही यांचा त्रास सहन करावा लागला, ते सध्या जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रंगीत तालीम एखाद्याच्या जिवावर बेतू शकते, यांची दखल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आहे. मॉकड्रील हे जर कोणाच्या आयुष्यावर बेतणारे असेल तर ते योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणाची कोकण आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आयुक्त जिल्ह्यात येऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील व आपला अहवाल देतील, नंतरच दोषी असतील तर कारवाई करू, मॉकड्रील असे असू नये, असे मत ही त्यांनी यावेळी मांडले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर