शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 16:08 IST

Dasram Uddhav Thackeray, Narayan Rane, Shiv Sena , Vaibhav Naik, sindhudurg ' दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी केलेली टीका राणेंनी स्वतःवर ओढवून घेतली ! : वैभव नाईक राणेंनी केला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख

कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील संयमी व सुसंस्कृत नेते आहेत. गेल्या पंधरा वर्षात शिवसेना सोडल्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर असंख्य वेळा त्यांचे नाव घेऊन टीका केली . परंतु ठाकरेंनी चुकूनही राणेंच्या नावाचा उल्लेख केला नाही .

दसरा मेळाव्याच्या भाषणात ठाकरेंनी राणे आणि त्याच्या मुलांचा उल्लेख टाळला होता . मात्र , शिवसेना पक्षप्रमुखांनी दिलेले विशेषण आपल्यालाच चपखल बसते हे राणेंच्या लक्षात आल्याने त्यांनी ठाकरेंनी उडवलेली टोपी स्वत : हून झेलली आणि आपल्या डोक्यावर घालून घेतली , अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पत्रकार परिषदेत आपण कोणाविषयी बोलत आहोत , याचेही भान राणेंना राहिले नाही . माजी मुख्यमंत्री असलेल्या राणेंनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवारांपर्यंत सुसंस्कृत विरोधी नेत्यांची परंपरा आहे . त्यामुळे महाराष्ट्रात राजकारण करत असताना सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते सभ्यतेचे काही अलिखित संकेत पाळतात. राणेंनी मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या ठाकरेंचा एकेरी उल्लेख करून सभ्यतेचे अलिखित संकेत पायदळी तुडवले आहेत.आमदार नीतेश राणेंना मी सांगू इच्छीतो की , मातोश्रीच्या अंगणात तुळशी वृंदावनच आहे . ' आपण हसे लोकाला आणि शेंबुड आपल्या नाकाला ' अशीच काहीशी नीतेश यांची अवस्था झाली आहे . मुळात ' संस्कार ' हा शब्दच त्यांच्या तोंडी शोभत नाही, असेही नाईक यांनी या म्हटले आहे .

 

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाVaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग