शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 14:05 IST

आमदार राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट आहे. त्यांनी तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच, असे आव्हानही शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठळक मुद्देराणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट : सुशांत नाईक यांची टीकातीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच

कणकवली : अवघ्या तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून होणाऱ्या कचरा प्रक्रिया प्रकल्पातून सोन्याचा धूर निघणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करतानाच आमदार राणेंचा कचरा प्रकल्प हा केवळ निवडणूक स्टंट आहे. त्यांनी तीन एकर जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून दाखवावेच, असे आव्हानही शिवसेना नगरसेवक सुशांत नाईक यांनी दिले. येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख शेखर राणे, बाळू पारकर, तेजस राणे, नगरसेविका मानसी मुंज, योगेश मुंज आदी उपस्थित होते.यावेळी सुशांत नाईक म्हणाले, विरोधकांना ९०० कोटींच्या प्रकल्पातील काय कळणार? असा प्रश्न आमदार नीतेश राणे यांनी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित केला होता. खरे तर हा कचरा प्रक्रिया प्रकल्प म्हणजे निवडणूक स्टंट आहे.

आजवर नीतेश राणेंचे रिव्हर राफ्टींग, औषध आपल्या दारी, मोफत वायफाय, मोकाट कुत्रे पकडणे मोहीम आदी सर्वच प्रकल्प सुरू झाले आणि अल्पावधीत बंद पडले. तशीच परिस्थिती या कचरा प्रक्रिया प्रकल्पाची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही जनतेला जागरूक करीत आहोत.कणकवलीतील कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी नगरपंचायतीने ३ एकर जागा भाडेतत्त्वावर दिली आहे. या जागेत प्रतिदिन १७५ मेट्रीक टन कचरा साठविणे अवघड आहे. तरीही एवढ्याशा जागेत ९०० कोटी रुपये खर्च करून कचरा प्रकल्प कसा काय होणार.

हा प्रकल्प साकारणाऱ्या ए. जी. डॉटर्स या कंपनीने नगरपंचायतीशी करार केला आहे. मात्र या करारात प्रकल्पासाठी कुठली यंत्रसामग्री वापरणार, कचरा प्लांट किती जागेत असणार, कचऱ्यावर प्रक्रिया झाल्यानंतर उर्वरित माल कुठे टाकला जाणार याचा कोणताही उल्लेख केलेला नाही.

अशाप्रकारे अनेक मुद्यांचा उल्लेख करार पत्रावर करण्यात आलेला नाही. त्यामुळे जर या कंपनीचे नुकसान झाले तर नगरपंचायत विरोधात न्यायालयात जाण्याचे अधिकार एकप्रकारे सत्ताधाऱ्यांनी ए. जी. डॉटर्स कंपनीला दिले आहेत. केवळ आगामी निवडणुकांमध्ये कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा प्रचाराचा मुद्दा बनविला जाणार असल्याची टीका सुशांत नाईक यांनी यावेळी केली.प्रकल्पाला आमचा विरोध नाहीकणकवलीत ए. जी. डॉटर्सकडून होत असलेला कचरा प्रकल्प झालाच पाहिजे. तोदेखील ९०० कोटींचा असायला पाहिजे. १०-२० कोटींचा प्रकल्प करून नागरिकांची फसवणूक आमदार राणेंनी करू नये. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूक होईपर्यंत हा प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे. या प्रकल्पाला आमचा विरोध नसून तो प्रकल्प होण्यासाठीच आमचा प्रयत्न असेल, असे नगरसेवक सुशांत नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग