शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

राम नामाच्या गजराने  परिसर दुमदुमला!-कणकवलीत रामजन्म उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 14:43 IST

राम जन्मला ग सये, राम जन्मला ' असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात  परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला.

कणकवली (सुधीर राणे ):' राम जन्मला ग सये, राम जन्मला ' असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात  परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपूर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा पार पडला. राम नामाच्या गजराने येथील  परिसर दुमदुमुन गेला होता.     

श्री राम नवमी उत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार पासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान परिसरात भाविकांची लगबग सुरु होती. श्री राम जन्माची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणेच शनिवारी सकाळी श्री काशिविश्वेश्वर मंदिरात काही धार्मिक विधि पार पडले. त्यानंतर सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कीर्तनाला प्रारंभ झाला. श्रीरामाची महती वर्णन करत कीर्तनकारानी राम जन्माची कथा सांगितली. दुपारी १२ वाजता कीर्तनाच्या माध्यमातून राम जन्म झाला.

    त्यानंतर श्रीरामाच्या बाल मूर्तिला पाळण्यात घालुन झोके देण्यात आले. तसेच पारंपारिक पाळणा गितेही म्हणण्यात आली. त्यानंतर भाविकानी श्रीराम मुर्तीचे दर्शन घेतले. तसेच त्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.हा श्रीराम जन्माचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाविकानी गर्दी केली होती. या रामजन्म सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

        दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी परमहंस भालचंद्र महाराज संस्थानचे अध्यक्ष सुरेश कामत, सचिव अशोक सापळे, व्यवस्थापक विजय केळुसकर , गुरु करंबेळकर ,बंडू हर्णे, चेतन अंधारी, प्रसाद अंधारी आदी उपस्थित होते.

 कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थान परिसरातील श्री काशिविश्वेश्वर मंदिरात शनिवारी भावपुर्ण वातावरणात श्री रामजन्म सोहळा झाला.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग