शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी घणसोली येथे ३९४ मीटर लांबीचा बोगदा पूर्ण
2
१० जूनपर्यंत कोस्टल रोडची दुसरी बाजू खुली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
3
LIC चा केंद्राला ३,६६२ कोटींचा लाभांश; RBI देखील सरकारला देणार २.११ लाख कोटी
4
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत
5
रुग्णालयातील अधीक्षक पद वैद्यकीय शिक्षण विभाग भरणार; अधिष्ठाताच्या अधिकारांवर गदा
6
राजधानी दिल्ली होरपळली! पारा विक्रमी ४९.९ अंशांवर; राजस्थान, हरयाणात तापमान ५०च्या पुढे
7
डोंबिवलीतील धोकादायक उद्योगांचे पाताळगंगा, अंबरनाथला स्थलांतर: उद्योगमंत्री उदय सामंत
8
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
9
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
10
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
11
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
12
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
13
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
14
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
15
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
16
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
17
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
18
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
19
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना

राजस्थानच्या पती, पत्नीवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:22 AM

वेगळे दुकान घातल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुडाळ पानबाजार येथे राहणाऱ्या वासुदेव माली व कांतादेवी माली (मूळ रा. राजस्थान) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देराजस्थानच्या पती, पत्नीवर गुन्हा दाखलमहिलेला मारहाण करून धमकीप्रकरण

कुडाळ : वेगळे दुकान घातल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुडाळ पानबाजार येथे राहणाऱ्या वासुदेव माली व कांतादेवी माली (मूळ रा. राजस्थान) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वासुदेव माली हे राजस्थान येथील असून सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी कुडाळ बाजारपेठेत कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या दुकानात राजस्थानातील त्यांच्याच गावातील लक्ष्मण माली हे कामाला होते. गेल्या पाच महिन्यांपूर्वी लक्ष्मण माली यांनी कुडाळ पान बाजार येथे स्वतंत्र दुकान सुरू केले असून हे दुकान घातल्यावरून वासुदेव व त्यांची पत्नी कांतादेवी हे दोघेही गेले काही दिवस लक्ष्मण व त्यांच्या पत्नीशी वादविवाद करीत होते.

याच वाद-विवादावरून रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण माली हे राहत असलेल्या भाड्याच्या घरात खोलीत वासुदेव व त्यांची पत्नी यांनी लक्ष्मण माली यांची पत्नी ललिता हिला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली.

यावेळी लक्ष्मण हे दुकानात होते. यावेळी ललिता हिने त्यांना संपर्क करण्याचा मोबाईलवर प्रयत्न केला. त्यावेळी या दोघांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला, अशी तक्रार पोलीस ठाण्यात ललिता हिने दिली आहे. ललिता हिच्या तक्रारीनुसार वासुदेव माली व कांतादेवी माली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग