शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे सावंतवाडीत संमेलन, अध्यक्षपदी राजन गवस यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 16:47 IST

'समाज असतो म्हणून साहित्य असतं' हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग समाज साहित्य संघटनेचे साहित्य संमेलन शनिवार १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वा. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ.राजन गवस   यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून कादंबरीकार प्रा.प्रवीण बांदेकर यांना निमंत्रित करण्यात आले आहे.'समाज असतो म्हणून साहित्य असतं' हा विचार प्रमाण माणून साहित्या बरोबर सामाजिक क्षेत्रात तळातल्या वर्गासाठी कार्यरत राहणाऱ्या व्यक्तींना जोडून घेण्याच्या उद्देशाने समाज साहित्य संघटना सिंधुदुर्ग ही संस्था सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी पासून समाज साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत.

याच पार्श्वभूमीवर भंडारभोग, चौंडक, धिंगाणा, कळप, तणकट ब-बळीचा असे व्यवस्थेत हस्तक्षेप करणारे कादंबरी लेखन करून साहित्य क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या डॉ.गवस यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर आपल्या चाळेगत,उजव्या सोंडेच्या बाहुल्या, इंडियन ॲनिमल फॉर्म अशा कादंबरीलेखनामधून आजच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय प्रदूषित व्यवस्थेबद्दल प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रा. बांदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.हे संमेलन दोन सत्रात आयोजित करण्यात आले आहे. पहिल्या सत्रात उद्घाटन तसेच समाज साहित्य संघटनेतर्फे यावर्षी सिंधुदुर्ग सुपुत्र इतिहासकार "गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर समाज पुरस्कार"  कष्टकऱ्यांच्या नेत्या उल्का महाजन यांना जाहीर करण्यात आला आहे. तर काशीराम साटम स्मृती "समाज साहित्य कादंबरी पुरस्कार" कृष्णात खोत यांना जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण गवस यांच्या हस्ते होणार आहे.दुसऱ्या सत्रात कवी प्राचार्य डॉ गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कविसंमेलनात जुन्या-नव्या कवींचे काव्यवाचन होणार असून काव्य वाचनासाठी सहभागी होणाऱ्या कवींनी आपली नावे प्रा.मनीषा पाटील (९४२२८१९४७४) यांच्याकडे नोंदवावीत असे आवाहन संस्था अध्यक्ष मधुकर मातोंडकर आणि कार्यवाह सरिता पवार यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग