बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 05:23 PM2020-12-11T17:23:42+5:302020-12-11T17:27:32+5:30

women and child development, sindhudurgnews महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले.

Raise awareness in all schools in the district to prevent sexual abuse of children | बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती

बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती

Next
ठळक मुद्दे बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी शाळांमध्ये जनजागृती करणारराजेंद्र दाभाडे यांचे प्रतिपादन : बालकांवरील लैंगिक अत्याचाराबाबत कार्यशाळा

सिंधुदुर्ग : महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये जाऊन जनजागृती करणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कसाल न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार कार्यशाळेत केले.

९ डिसेंबर रोजी सकाळी कसाल हायस्कूल येथे विद्यार्थ्यांसाठी सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रभारी पोलीस उपअधीक्षक संध्या गावडे, सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी रोहिणी साळुंखे, सायबर सेल सहायक पोलीस उपनिरीक्षक सुतार, पोलीस उपनिरीक्षक जगताप, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडुस, मुख्याध्यापक गुरुनाथ कुसगावकर व विद्यार्थी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे म्हणाले, जिल्ह्यातील महिला व बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी प्रत्येक शाळेत कार्यशाळा घेऊन जनजागृती केली जाणार आहे.

Web Title: Raise awareness in all schools in the district to prevent sexual abuse of children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.