शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
2
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
3
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
4
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
5
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
6
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
7
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
8
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
9
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
10
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
11
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!
12
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
13
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
14
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
15
कमाल! १ मार्काने नापास झाली पण रडत नाही बसली; जिद्दीने अभ्यास करून स्वप्न केलं साकार
16
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
17
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
18
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
19
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 

रात्री बरसला, सकाळनंतर ओसरला; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 27, 2025 17:46 IST

तीन तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तुरळक पडणाऱ्या पावसामुळे पाऊस कमी झाला असे वाटत असतानाच सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. दुपारनंतर मात्र पुन्हा पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याचे चित्र होते.रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. देवगड, कणकवली आणि वेंगुर्ला तालुक्याला पावसाने झोडपून काढले. या तिन्ही तालुक्यामध्ये १०० मि.मी. पुढे पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९६.२५ च्या सरासरीने ७७० मि.मी पाऊस पडला आहे.जिल्ह्यात रविवार व सोमवारी पावसाने विश्रांती घेत काही भागात उघडीप दाखविली होती. काही भागात सूर्यप्रकाशही पडला होता. काही भागात तुरळक पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असे जिल्हावासीयांना वाटत होते. मात्र, सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळपर्यंत कोसळत होता. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण होते की काय असे वाटत होते.नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही भागात पडझड होण्याचे सत्र कायम आहे.मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९६.२५ च्या सरासरीने ७७० मी.मी पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग ३४ मि.मी., सावंतवाडी ७२ मि.मी., वेंगुर्ला ११६ मि.मी., कुडाळ ८८ मि.मी., मालवण ८६ मि.मी., कणकवली १२८ मि.मी., देवगड १८० मि.मी. आणि वैभववाडी ६६ मि.मी. पाऊस पडला आहे.

देवगडात १८० मिलिमीटर पाऊसप्रशासनाच्या आकडेवारीनुसार देवगड तालुक्यात तब्बल १८० मि.मी. पाऊस पडला आहे. त्या पाठोपाठ कणकवली १२८ मि.मी तर वेंगुर्ला तालुक्यात ११६ मि.मी. पाऊस पडला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस