वैभववाडी : तालुक्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. काही भागात दमदार ते काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, वैभववाडी शहरात प्रथमच चांगला पाऊस झाला आहे.गेल्या पाच-सहा दिवसांपासून तालुक्यात अधूनमधून रिमझिम तर काही भागात दमदार पाऊस होत आहे. वैभववाडी शहराच्या आजूबाजूच्या गावांमध्येही पाऊस झाला. मात्र, पाऊस शहराला सतत हुलकावणी देत होता.अखेर रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात दहा ते पंधरा मिनिटे चांगला पाऊस झाला.दरम्यान, तालुक्यात सर्वच भागात रविवारी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. उंबर्डे, तिथवली या परिसरात दमदार पाऊस झाला. या भागात सुमारे २५ ते ३० मिनिटे पाऊस पडला. त्यामुळे काही शेतमळ्यांमध्ये पाणी साचल्याचे चित्र होते.
वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 17:42 IST
वैभववाडी तालुक्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. काही भागात दमदार ते काही भागात तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, वैभववाडी शहरात प्रथमच चांगला पाऊस झाला आहे.
वैभववाडीत विजांच्या कडकडाटासह पाऊस
ठळक मुद्देवैभववाडीत विजांच्या कडकडाटासह पाऊस पावसामुळे शेतात पाणी साचले