शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात पावसाची संततधार; महिन्याभरात ३९ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 4, 2024 19:19 IST

धरणे, तलावांच्या पाणी पातळीत वाढ

गिरीश परबसिंधुदुर्ग : बुधवारी रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणे, तलावांची पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळ पासून पावसाने उसंत घेतली. तर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दरम्यान गेल्या महिन्याभरात ३९ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शेतीयोग्य पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. बैलाच्या, यंत्राच्या साहाय्याने नांगरणी व लावणीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात सध्या शेतकरी सकाळी घर सोडून थेट संध्याकाळी माघारी परतत आहे. सकाळची न्याहरी, जेवण सर्व काही शेतात लावणीच्या ठिकाणी करताना दिसून येत आहे.दरम्यान बुधवारी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. नद्यांची धोका पातळी वाढली नसली तरी नद्यांमध्ये पाण्याचा जोर आहे. सकाळी पावसाचा जोर कमी झाला. बऱ्याच ठिकाणी ऊन पडले होते. कालच्या पावसाने २ घरांची पडझड झाली.

निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदतपाऊस सुरू झाल्यापासून दररोज घरांची पडझड झालेली अहवालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विशेष करून घरांना लागून असलेली झाडे घरावर कोसळून घरांची पडझड होत आहे. काही सरकारी मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची नोंद आहे. सरकारी व खासगी मालमत्तांच्या नुकसानीचा आकडा प्रशासनाने जाहीर केलेला नाही. पंचनाम्यानंतर निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.

९ प्रकल्प भरले; पाण्याचा विसर्ग सुरूकोरले सातंडी मध्यम पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या १० दिवसांपासून या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याच बरोबर आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, लोरे हे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस