शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

करुळ घाटात दरड कोसळली, वैभववाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 11:10 IST

वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले.

ठळक मुद्देकरुळ घाटात दरड कोसळली, वैभववाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरूचकुर्ली येथे घरावर वीज खांब कोसळला

वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले.

दरम्यान, कुर्ली येथे एका घरावर विजेचा खांब कोसळून नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुक्यातील मांडकुली येथील रस्यावर आलेले पाणी ओसरल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर हा मार्ग शुक्रवारी रात्री दोन वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे.तालुक्यात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सतत पडणाऱ्या पावसामुळे करुळ घाटात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दगड-मातीसोबत झाडेही उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अवघ्या काही मिनिटांत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दरड रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने वळविण्यास संधीच नव्हती. त्यामुळे शेकडो वाहनचालक घाटातच अडकले होते.दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घटनास्थळाकडे निघाले. त्याचबरोबर पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात करण्यात आली. दीड तासानंतर घाटरस्त्यातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते.

करुळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक दोन दिवस ठप्प झाली होती.कुर्ली-खडकदारा येथील वीज खंडितदरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ली खडकदारा येथील मानाजी शेळके यांच्या घरालगत वीज खांब उन्मळून घरावर पडला. मात्र, घरातील कुणालाही सुदैवाने दुखापत झाली नाही. या प्रकारामुळे सर्व वाडीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग