शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 15:09 IST

रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक योगेश अंबादास नागवेनकर (रा. म्हापसा-गोवा) संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

ठळक मुद्देरेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त

सावंतवाडी : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक योगेश अंबादास नागवेनकर (रा. म्हापसा-गोवा) संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.रेल्वे पोलिसांंनी २८ रेल्वेची तिकीटे, एक मोबाईल आणि लॅपटॉप असे साहित्यही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.सिंधुदुर्गमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २८ फेबु्रवारीला म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात सावंतवाडीसह जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणांचा समावेश होता. यात मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आढळून आला होता. या प्रकरणी तेव्हा काही आरोपींना अटकही करण्यात आले होते.सावंतवाडीतील पोस्टाच्या कर्मचाऱ्यालाही यापूर्वी अटकया प्रकरणी सावंतवाडी पोस्टाचा कर्मचारी अजय कोळंबकर यालाही पूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीत नागवेनकर याच्या सांगण्यानुसार आपण हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यानुसार नागवेनकर याला कणकवली येथील रेल्वे पोलिसांनी अटक करून सावंतवाडीतील न्यायालयात हजर केले.

यावेळी त्याच्याकडून २८ रेल्वेची तिकीटे, एक मोबाईल आणि लॅपटॉप असे साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्याची पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपीच्यावतीने अ‍ॅड. सुहेब डिंगणकर तसेच अ‍ॅड. राहुल पई यांनी काम पाहिले.

टॅग्स :fraudधोकेबाजीrailwayरेल्वेsindhudurgसिंधुदुर्गgoaगोवा