शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

कोकण मार्गावरील रेल वाहतूक वळविली

By admin | Updated: August 24, 2014 22:34 IST

मालगाडी घसरली : सहा एक्स्प्रेस मिरजमार्गे

मिरज : मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मिरजमार्गे वळविण्यात आली आहे. नेत्रावती, दुरांतो, तिरूनेलवेल्ली, कोचीवेल्ली, कोईमतूर आदी लांब पल्ल्याच्या सहा एक्स्प्रेस गाड्या मिरजमार्गे पुणे व बेळगावकडे रवाना झाल्या. आज सकाळी कोकण रेल्वेमार्गावरील करंजोळी येथे मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या लोंढा, बेळगाव, मिरज, पुणे मार्गे मुंबईकडे रवाना झाल्या. गोव्यातून त्रिवेंद्रम-लोकमान्य टिळक टर्मिनस (१६३४६), कोईमतूर-बिकानेर एक्स्प्रेस (२२४७६), कोचीवेल्ली-बिकानेर एक्स्प्रेस (१६३१२) या मिरजमार्गे पुण्याला पाठविण्यात आल्या, तर मुंबईतून लोकमान्य टिळक टर्मिनस-त्रिवेंद्रम नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४५), हापा-तिरूनेलवेल्ली एक्स्प्रेस (१९५७८), निजामुद्दीन-एर्नाकुलम दुरांतो एक्स्प्रेस (१२२८४) या मिरज मार्गे गोव्याला गेल्या. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक मिरजमार्गे वळविण्यात आल्याने एक्स्प्रेस आठ ते दहा तास विलंबाने धावत असल्याने प्रवाशांचे हाल झाले. मिरज रेल्वेस्थानकावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्याने रेल्वेचालकांची व्यवस्था करण्यात आली. (वार्ताहर)