शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
किती धोक्याची? सॅमसंगची स्मार्ट रिंग बॅटरी फुगली, बोटात खुपली; वापरकर्ता विमानतळावरून थेट हॉस्पिटलमध्ये
3
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
4
अब्जाधीशांच्या यादीत पहिल्यांदाच सामील झाला शाहरुख खान, पाहा किती झाली संपत्ती?
5
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
6
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
7
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
8
गुरुवारी दसरा २०२५: ‘अशी’ करा स्वामी सेवा, वर्षभर पुण्य लाभेल; देवी लक्ष्मी लाभच लाभ देईल!
9
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
10
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
11
Gold Silver Price 1 October: एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
12
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
13
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
14
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
15
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
16
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
17
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
18
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
19
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
20
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कोटपाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 11:32 IST

सिंधुदुर्ग : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथील विक्रेत्यांवर  सिंधुदुर्ग ...

ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्यांवर कोटपाची कारवाईसिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांची विशेष मोहिम

सिंधुदुर्ग : सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान आणि शाळा- कॉलेजजवळ तंबाखूची अवैध विक्री करणाऱ्या वेंगुर्ला, सावंतवाडी आणि मालवण येथील विक्रेत्यांवर सिंधुदुर्ग पोलिसांनी कारवाई करण्यात आली. 

धूम्रपान आणि तंबाखू- मावा सेवनाच्या व्यसनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. त्यात मुले आणि महाविद्यालयीन युवक बळी ठरत आहेत. त्यांचे दुष्पपरिणाम लक्षात घेता सिंधुदुर्ग पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांच्या नेतृवाखाली तंबाखू विरोधी कोटपाची विशेष कारवाई मोहीम हाती घेतली आहे.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करून कायद्याचे उल्लघंन करणाऱ्यांवर सिगारेट- तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध कायदा ( कोटपा ) अंतर्गत कडक कारवाई करण्यात येते. त्यांचे खास प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम तसेच अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली संबंध हेल्थ फाऊंडेशन तर्फे कोटपा कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच फाऊंडेशनच्या माध्यमातुन कृती कार्यक्रमही आखला आहे.वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील पान टपऱ्यांवर कारवाईवेंगुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांचा नेतृत्वाखाली वेंगुर्ला पोलिसांनी कोटपा कायद्यानुसार शुक्रवारी शाळा महाविद्यालय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्या पान टपऱ्या दुकानांवर कारवाई केली.

कोटपा कायदा कलम ४ नुसार सार्वजनिक धूम्रपान करणारे आणि कोटपा कलम ६ (ब), (अ) नुसार वेंगुर्ला बाजार, मारुती नाका आणि शाळा परिसरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तंबाखू सिगारेटची अवैध विक्री करणाऱ्याचे धाबे दणाणले असून स्थानिकांकडून पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक केले जात आहे. वेंगुर्लाप्रमाणे संध्याकाळी सावंतवाडी येथे ही कारवाई झाली.

केवळ तंबाखू वापरामुळे ५० टक्के कॅन्सरएकूण कॅन्सर रुग्णांपैकी सर्वात जास्त म्हणजे ५० टक्के कॅन्सर हे केवळ तंबाखू वापरामुळे होतात. केवळ ३० टक्केच लोक रुग्णालयात उपचार घेतात. समाजात तंबाखू सेवनावर प्रतिबंध आल्याशिवाय मरणाऱ्यांचे प्रमाण कमी होणार नाही. कोटपा कायद्याची प्रभावी अमंलबजावणी केल्यास तंबाखूमुळे होणारे कॅन्सरचे प्रमाण कमी करता येईल असे केअरिंग फ्रेंड्सचे निमेश सुमती सांगतात.

कोटपा-२००३ कायदा म्हणजे काय ?सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा अधिनियम २००३ हा केंद्र सरकरचा कायदा आहे. या कायद्यात एकूण पाच प्रमुख कलमे आहेत. त्यापैकी कलम-४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणे गुन्हा आहे. तर कलम- ६ (ब ) नुसार कोणत्याही शैक्षणिक संन्स्थेच्या १०० यार्ड आवारात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर प्रतिबंध आहे. तसेच बाल न्याय कायदा कलम-७७ नुसार बालकांना किव्हा बालकांकडून तंबाखूजन्य पदार्थ विक्री केल्यास १ लाख रुपये आणि ७ वर्षाची शिक्षची तरतूद करण्यात आली आहे. बाल न्याय कायदा कलम ७७ नुसार कारवाई करणारे महाराष्ट्र हे पाहिले राज्य आहे.

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदीsindhudurgसिंधुदुर्ग