शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: July 23, 2016 23:46 IST

खड्ड्यांमुळे दोघांचा बळी : शेकडो वाहनचालक जायबंदी; लोकप्रतिनिधींनी आता तरी लक्ष द्यावे

विनोद परब -- ओरोस  --काही दिवसांपूर्वीच नवीन जिल्हा शल्य चिकित्सकांना झालेला अपघात आणि शुक्रवारी तलाठी उत्तम पवार यांचा झालेला अपघाती मृत्यू या प्रमुख घटनांमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नाकडे गांभिर्याने पाहण्याची वेळ आता आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर खड्डे चुकविताना दुचाकीवर पाठिमागे बसलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.खड्ड्यांमुळे या महामार्गाची अक्षरश: चाळण झाली असून नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या महामार्गाची योग्य ती देखभाल केली जात नाही. परिणामत: अपघातांचे प्रमाण वाढले आहे. कसाल खर्येवाडी, जैतापकर कॉलनी, ओरोस रवळनाथ नगर, जिजामाता चौक, पीठढवळ नदीवरील पूल अशा अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.गेल्या बुधवारी नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारण्यासाठी पुण्याहून ओरोसला येत असताना कणकवली वागदे पेट्रोलपंपासमोर पडलेल्या खड्ड्यांमुळे त्यांच्या मोटारीला अपघात झाला. त्यात ते कुटुंबियांसह किरकोळ जखमी झाले. हा अपघात सुदैवाने एवढ्यावरच निभावला. जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्याला सुरुवातीलाच खड्ड्यांचा असा अनुभव आला.शुक्रवारी कणकली तालुक्यातील जानवलीमधील रतांब्याचा व्हाळ येथे खड्ड्यांमुळेच दुचाकी वाहन ट्रकवर आदळून झालेल्या अपघातात तलाठी तसेच कवी असलेले उत्तम पवार यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. खड्ड्यांमुळेच त्यांना आपले प्राण गमवावे लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. खड्डा चुकवत असताना त्यांचा तोल गेला आणि ट्रकला धडकून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटना पाहता सर्वसामान्य नागरिकांना या खड्ड्यांचा किती त्रास होत असेल याची कल्पना येते. या मार्गाची देखभाल करण्याची जबाबदारी महामार्ग प्राधिकरणाकडे आहे. मंत्र्यांच्या नियोजन बैठकीच्यावेळी या मार्गाच्या दुरुस्तीबाबत केलेल्या सूचनांवर अधिकारीवर्ग केवळ मान हलवून काम करण्याचे आश्वासन देतात. त्यानंतर मात्र काहीच होत नाही.खारेपाटणपासून बांद्यापर्यंत महामार्गाची दुरावस्थामुंबई-गोवा महामार्गावर खारेपाटणपासून बांद्यापर्यंत हजारो खड्डे पडले आहेत. महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना या महामार्गावरुन ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. महामार्गाचे कामही ठेकेदाराने निकृष्ट केल्याच्या तक्रारी स्थानिक पुढारी, नागरिकांनी करुनही याकडे संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. या खड्ड्यांमुळे दोन महिन्यात दोन बळी आतापर्यंत गेले आहेत. शेकडो चालक जायबंदी झाले आहेत.