शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम अभियंता धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 16:43 IST

Pwd Sawantwadi Sindhudurg : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेराव घालत आंबोली घाट दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारला. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम अभियंता धारेवरप्रलंबित कामावरून जाब : आंबोली घाटाबाबतही लक्ष वेधले

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत माने यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने घेराव घालत आंबोली घाट दुरवस्था, उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, चौकुळ बेरडकी रस्ता, मळगाव घाट रस्ता आदींबाबत जाब विचारला. आंबोली घाटात दरड कोसळत असून गटार, नालेसफाई झालेली नाही. यामुळेच ही दरड कोसळत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केला आहे.यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, राजू धारपवार, दर्शना बाबर-देसाई, बावतीस फर्नांडिस, नंदू साटेलकर, आसिफ शेख, सुरेश वडार, अर्षद बेग, जहिरा ख्वाजा, आसिफ ख्वाजा, नंदकिशोर नाईक, इफ्तिकार राजगुरू, याकुब शेख, कौस्तुभ नाईक आदी उपस्थित होते.

आंबोली घाटाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष याला कारणीभूत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तर उपजिल्हा रुग्णालयातील अर्धवट कामाबाबत, चौकुळ बेरडकी रस्ता कामात झालेलं निकृष्ट दर्जाचे काम, मळगाव घाट रस्ता दुरुस्ती आदीकडे लक्ष वेधले. यावेळी कार्यकारी अभियंता माने यांनी आंबोली, चौकुळ बेरडकी येथे उद्या प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यास आठ दिवसांत सांगावे असे सांगितले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाsindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभाग