शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत गौण उत्खनन, पाचपट दंडासह साडेसात लाखापर्यंत दंडाची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2017 19:42 IST

गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व  वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत.

मालवण : गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात चोरीछुपे उत्खननाला पेव फुटत असल्याने महाराष्ट्र शासनाने अनधिकृत उत्खनन व  वाहतुकीवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक निर्बंध लागू केले आहेत. गौण खनिज उत्खनन नियमातील निकषात बदल करत अनधिकृत उत्खनन व वाहतूक करणा-यांवर पाच पट दंडासह साडेसात लाख रुपयांपर्यंत दंड लावला जाणार आहे. त्यानंतर अनधिकृत वापरासाठी वापर असल्यास संबंधित व्यक्तीची मालमत्ता जप्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

दरम्यान, मालवण तालुक्यात कर्ली व कालावल खाडी पात्रासह अन्य भागातही मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जाते. अनधिकृतरित्या वाळू उत्खनन व वाहतूक होत असलेल्या ठिकाणाहून महसूल विभागाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासनाच्या नव्या नियमानुसार कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. वाळू उत्खनन मार्गावर विशेष महसूल पथके पोलीस बंदोबस्तासह नियुक्त करण्यात आली आहेत, अशी माहिती तहसीलदार समीर घारे यांनी दिली.  

गौण खनिज उत्खनन प्रक्रिया नियमात अनेक तरतुदींचा समावेश करण्यात आला आहे. रॉयल्टीमध्ये सवलत देण्यात आली असली तरी शासनाने सवलती देताना अनधिकृत उत्खनन व वाहतुकीवर कठोर निर्बंध  घातले आहेत. उत्खननाबाबतचा कोणताही अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे अनधिकृत गौण खनिज उत्खनन तसेच वाहतूक करणाºयांवर कडक धोरण निश्चित करण्यात आल्याने अनधिकृतवाल्यांचे धाबे दणाणले आहेत. महसूल प्रशासनाच्यावतीने ही कारवाई करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत.साडे सात लाखांपर्यंत दंडाची तरतूदगौण खनिज अनधिकृत उत्खनन व वाहतूक करताना वापरण्यात येणारी यंत्र सामुग्री, साधन सामुग्री, व वाहतूक साधने याबाबत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ नुसार दंडाची रक्कम नव्याने निश्चित करण्यात आली आहे. यात २५ हजारांपासून साडेसात लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. यात ड्रील मशीनचा वापर - २५ हजार दंड, ट्रक्टर, ट्रॉली, हाफ बॉडी ट्रक, सक्शन पंप यांचा वापर - १ लाख दंड, फुल बॉडी ट्रक, डंपर, ट्रॉलर, कंप्रेसर याचा वापर- २  लाख दंड, ट्रॉलर, बार्ज, मोटोराईज बोट यांचा वापर - ५ लाख रुपये दंड, तसेच मोठी सामग्री एक्स केव्हेटर व मेकेनाईजचा वापर झाल्यास ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे. अनधिकृत आढळ्यास मालमत्ताही घेणार ताब्यातअनधिकृतरित्या गौण खनिज, वाळू उत्खनन किंवा वाहतूक करताना सापडून आल्यास गौण खनिजाच्या पाच पट दंड तसेच यंत्रसामुग्री व वाहनावर नव्या नियमानुसार दंड होणारच आहे. तसेच वैयक्तिक जातमुचलका जिल्हाधिकारी किंवा प्रांताधिकारी यांच्याकडे सादर करून पुन्हा अनधिकृत उत्खनन वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट करावे लागणार असून तारण म्हणून घर, जमीन, राष्ट्रीयकृत बँकाची हमी द्यावी लागणार आहे. दुस-यावेळी अनधिकृत गौणखनिज उत्खनन व वाहतूक करताना आढळल्यास साधन सामुग्री व वाहतुकीच्या साधनासह मालमत्ताही ताब्यात घेतल्या जाणार आहेत.