शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खारेपाटण वीज उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा करा; नितेश राणेंची मागणी

By सुधीर राणे | Updated: September 27, 2022 16:08 IST

खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही.वरील वीज पुरवठा बाधित झाला होता.

कणकवली : सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला २४ तास वीजपुरवठा होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या निवेदनात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्हयाला कणकवली तालुक्यातील खारेपाटण येथील २२०/१३२ के.व्ही. तसेच सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली येथील २२०/१३२ के.व्ही.च्या अति उच्चदाब केंद्रातून विद्युत पुरवठा होत आहे. २२ सप्टेंबर २०२२ रोजी खारेपाटण येथील अतिउच्च दाबाच्या उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे मालवण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे, देवगड, वाडा, वैभववाडी, खारेपाटण येथील ३३/११ के.व्ही.वरील वीज पुरवठा बाधित झाला होता. त्यामुळे सुमारे १,२०,००० ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ आली.सिंधुदुर्ग जिल्हयाला विद्युत पुरवठा करणाऱ्या इन्सुली व खारेपाटण या दोन अति उच्चदाब केंद्रांपैकी एखाद्या केंद्रात भविष्यात अशा प्रकारचा बिघाड निर्माण झाल्यास दुसऱ्या केंद्रातून विद्युत पुरवठा करण्याची पर्यायी व्यवस्था निर्माण झाल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही. पर्यटनाच्या दृष्टीने जिल्ह्यात २४ तास सुरळीत विद्युत पुरवठा सुरू असणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आपल्या स्तरावरून त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे खारेपाटण येथील महापारेषणचे वीज उपकेंद्र आगीमुळे नादुरूस्त झाल्याने त्याचे दुरुस्तीसाठी आवश्यक निधीची उपलब्धता त्वरीत करून देण्यात यावी असेही निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे tourismपर्यटनelectricityवीज