शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात निषेध रॅली, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 19:56 IST

केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देकुडाळात निषेध रॅलीकेंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

कुडाळ : केंद्र सरकारच्या आक्रमक कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशनच्यावतीने कुडाळ शहरात निषेध रॅली काढत देशव्यापी सार्वत्रिक संपात सहभाग घेण्यात आला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.केंद्र सरकारच्या आक्रमक कामगार कायद्याविरोधी धोरणांना अटकाव घालण्यासाठी व विविध मागण्यांसाठी देशभरातील बहुतांशी कामगार संघटनांनी एकत्र येऊन ८ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात देशव्यापी सार्वत्रिक संपाची हाक दिली होती.

या संपात महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन कुडाळच्यावतीनेही सहभाग घेण्यात आला. बुधवारी कुडाळ शहरातून रॅली काढत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला. तसेच सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी संपकर्त्यांनी भाववाढ रोखण्यात यावी, कोट्यवधी बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती करावी, रोजगार व योग्य पगार यांचा मूलभूत हक्कांत समावेश करावा, रोजगाराची सुरक्षितता द्यावी, कायमस्वरूपी काम बाह्य स्त्रोत बंद केले जाऊ नये, कामगार कायद्यात कामगार विरोधी बदल करण्यात येऊ नयेत, कामगार संघटनांचे हक्क अबाधित ठेवण्यात यावेत, सामाजिक सुरक्षितता योजनात कपात करण्यात येऊ नये, किमान वेतन २१ हजार निश्चित करावे, सर्वांसाठी पेन्शन आणि बोनस लागू करण्यात यावा, नवीन पेन्शन योजना रद्द करावी, सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करण्यात येऊ नये, बँकांचे एकत्रीकरण तसेच खासगीकरण करण्यात येऊ नये, बँकेच्या ठेवीवरील व्याजदर वाढवण्यात यावेत, बँकातील थकित कर्ज पूर्णता आणि त्वरित वसूल करण्यात यावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग