शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चा काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 17:25 IST

पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळता आपली फसवणूक केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्यावतीने १० जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देअंध अंपग संघटनेच्यावतीने सावंतवाडीत निषेध मोर्चापालकमंत्र्यानी आश्वासन पाळले नाही

सावंतवाडी : पालकमंत्री दिपक केसरकर यांनी दिलेले आश्वासन न पाळता आपली फसवणूक केल्याप्रकरणी महालक्ष्मी अंध-अंपग सामाजिक संघटनेच्यावतीने १० जानेवारी रोजी त्यांच्या कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. येथील पालिकेने कारवाई करुन भटवाडी येथील निलेश नार्वेकर यांचा काढून टाकलेला स्टॉल पुन्हा उभारण्यास द्यावा, या मागणीसाठी अंध-अपंग सामाजिक संघटनेच्यावतीने नार्वेकर यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर अपंग दिनी उपोषण छेडले होते.

या उपोषणकर्त्यांची पालकमंत्री केसरकर यांनी भेट घेत नार्वेकर यांना शहरात स्टॉल उभारणीसाठी आपण पालिकेमार्फत सहकार्य करण्याची ग्वाही देत उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. पालकमंत्री यांनी दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवत अंध बांधवांनी आपले उपोषण मागे घेतले होते.मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पालिकेकडून कोणतीच दखल घेण्यात नाही. नार्वेकर यांनी यासंदर्भात मुख्याधिकारी जावडेकर यांची भेट घेत चर्चा केली असता शहरातील काही पाच जागा सुचवण्याचे जावडेकर यांनी नार्वेकर यांना सांगितले होते. त्यानुसार नार्वेकर यांनी लेखी पत्राने शहरातील पाच जागा सुचवल्या होत्या. मात्र या जागेवर स्टॉल उभारण्याबाबत कुठल्याही प्रकारचे पत्र किंवा लेखी सूचना आपल्याला मिळाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याचे नार्वेकर यांचे म्हणणे आहे.दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी आश्वासन देऊनही नार्वेकर यांची केलेली फसवणूक लक्षात घेता महालक्ष्मी अंध-अपंग सामाजिक संघटना या अन्यायाविरोधात १० जानेवारी रोजी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष हरी गावकर, उपाध्यक्ष विठ्ठल शिरोडकर यांनी म्हटले आहे.

अंध-अपंगांचा पाच टक्के राखीव निधी अनुदान स्वरूपात १०० टक्के मिळावा यासाठी जिल्हाधिकारी, समाज कल्याण अधिकारी यांना आदेश द्यावेत आदी विविध मागण्या या मोर्चाव्दारे ते मांडणार असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग