शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

महाराष्ट्रात नारळाची उत्पादनक्षमता कमी

By admin | Updated: September 4, 2016 00:37 IST

तपस भट्टाचार्य : नारळ बागायतदार, उद्योजकांचा मेळावा

रत्नागिरी : अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात नारळाचे उत्पादन क्षेत्र जास्त आहे. मात्र, आपल्याकडे उत्पादन क्षमता कमी असून, याचा गांभीर्याने विचार नारळ उत्पादकांनी करणे आवश्यक आहे. नारळ पिकाबाबत विद्यापीठातर्फे संशोधन होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य यांनी केले.प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये व श्रीफळ उत्पादक हितवर्धक संघ, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नारळ दिनानिमित्त नारळ बागायदार व उद्योजकांचा मेळावा अल्पबचत सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी डॉ. भट्टाचार्य बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यासह माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, केरळचे तज्ज्ञ महेश्वरम् अप्पा, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, नारळ बोर्डाचे उपाध्यक्ष राजाभाऊ लिमये, नारळ बागायतदार संघाचे अध्यक्ष अनिल जोशी, अभिजीत हेगशेट्ये, नाझीम पडवेकर उपस्थित होते.डॉ. भट्टाचार्य यांनी नारळाचे उत्पादन क्षेत्र मोठे असतानाही यातून मिळणाऱ्या कमी उत्पन्नाचे कारण शोधणे महत्वाचे असल्याचे यावेळी सांगितले. केरळ येथील तज्ज्ञ महेश्वर अप्पा यांनी महाराष्ट्र आणि केरळ राज्यांमधील नारळ उत्पादनाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी सांगितले की, नारळाला केवळ पावसाचे पाणी पुरेसे असल्याचा गैरसमज येथील बागायदारांमध्ये आहे. मात्र, नारळाला दररोज पाण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी सांगितले की, नारळ पिकाच्या वाढीव उत्पादनासाठी येथील बागायदारांना मार्गदर्शनाची गरज असून, या मार्गदर्शनामुळे यातील काही तांत्रिक बाबी येथील बागायदारांना कळतील, असा विश्वास व्यक्त केला. बारीक-बारीक गोष्टी समजून घेऊन नारळ पीक व उत्पादनाच्या विकासाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)