शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

मालवण पंचायत समितीने बनविले प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अ‍ॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 16:54 IST

कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अ‍ॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.

ठळक मुद्देमालवण पंचायत समितीने बनविलेल्या प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अ‍ॅपचे उद्घाटनजास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा : हेमंत वसेकर 

मालवण : कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांकडे बराच वेळ उपलब्ध आहे. विद्यालय अ‍ॅपच्या माध्यमातून त्यांना वेळेचा सदुपयोग करता येणार आहे. मालवण पंचायत समितीने बनविलेले हे अ‍ॅप जास्तीत जास्त पालक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी येथील पंचायत समितीने बनविलेल्या प्रायमरी एज्युकेशन विद्यालय अ‍ॅपचे उद्घाटन शुक्रवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वसेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, शिक्षण सभापती सावी लोके, महिला बालकल्याण सभापती माधुरी बांदेकर, जिल्हा परिषद सदस्य सरोज परब, सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परूळेकर, पंचायत समिती सदस्य सुनील घाडीगावकर, अशोक बागवे, मनीषा वराडकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी कैलास राऊत, विस्तार अधिकारी उदय दीक्षित, सहाय्यक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण तसेच तालुक्यातील केंद्रप्रमुख उपस्थित होते.

पराडकर म्हणाले, येथील पंचायत समितीने नेहमीच वैविध्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. कोरोना कालावधीत विद्यालय अ‍ॅपचा उपक्रम विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. पाताडे म्हणाले, तालुक्यात ६० टक्के विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांपर्यत हे अ‍ॅप पोहोचविण्याचा प्रयत्न आहे. शिवाय ग्रामपंचायतींना बीबीएनएल वायफायची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या अ‍ॅपचा वापर करता येणार आहे.

परूळेकर म्हणाले, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी अ‍ॅप निर्मितीची संकल्पना आम्ही मांडली. ही संकल्पना पंचायत समितीचे कर्मचारी, विषयतज्ज्ञांनी सत्यात साकारली. सूत्रसंचालन श्याम चव्हाण यांनी केले तर कैलास राऊत यांनी आभार मानले.अभ्यासक्रमांच्या पाठातील पीडीएफ फाईल बनविल्याहे अ‍ॅप बनविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अमर वाघमारे, गुरूनाथ ताम्हणकर, विनीत देशपांडे, दिनकर शिरवलकर, परशुराम गुरव, भागवत आवचार, नंदकिशोर हळदणकर या सर्वांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.विजय देशपांडे यांनी विद्यालय अ‍ॅपची माहिती उपस्थितांना दिली. या अ‍ॅपमध्ये इयत्ता तिसरी ते सातवीपर्यंतचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. अभ्यासक्रमातील पाठांच्या पीडीएफ बनविल्या आहेत. पाठांची यु ट्युब लिंकही देण्यात आली आहे. नेटची सुविधा असल्यास लिंकवरून विद्यार्थ्यांना धडे अभ्यासता येणार आहेत.प्रत्येक पाठाखाली स्वाध्याय देण्यात आले आहेत. क्युआर कोडवरून देखील विद्यार्थ्यांना पाठाचा अभ्यास करता येणार आहे. प्रारंभी इंटरनेटद्वारे अ‍ॅपमधील पाठाचा भाग डाऊनलोड करून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर आॅफलाईन पद्धतीने विद्यार्थी या पाठांचा अभ्यास करू शकतील.

टॅग्स :Mobileमोबाइलsindhudurgसिंधुदुर्गzpजिल्हा परिषद