शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

अध्यक्ष, संचालकांचा गौरव :जिल्हा बँकेने आदर्श निर्माण केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:21 IST

BankingSector Sindhudrug- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत ८३ टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँक सभासदांनी गौरव केला.

ठळक मुद्दे अध्यक्ष, संचालकांचा गौरव :जिल्हा बँकेने आदर्श निर्माण केला वार्षिक सभेत जाणकार सभासदांनी मांडली मते

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील शेतकरी, बागायतदार, मच्छिमार आणि कर्जदारांना मोठा दिलासा देत बँकेची सुरू केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे. राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत ८३ टक्के कर्जाचे वितरण करून या बँकेने एक आदर्श निर्माण केला आहे, अशा शब्दांत सर्वसाधारण सभेत अध्यक्ष आणि संचालकांचा सर्वच बँक सभासदांनी गौरव केला. अभिनंदनाचा ठराव घेत बँकेच्या अत्याधुनिक कामकाज आणि पारदर्शकतेबाबत जाणकार सभासदांनी आपली मते मांडली.सत्ताधारी शिवसेना महाविकास आघाडीचे संचालक विरुद्ध भाजप संचालक असे शाब्दिक युद्ध रंगेल म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा भरगच्च सभासदांच्या उपस्थितीत झाली.कोरोनाचे सर्व नियम पाळून सकाळी ११ वाजल्यापासून सभासदांना मताचा अधिकार आणि सभागृहातील प्रवेशाबाबत ठराव एकत्रित करीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाली. शरद कृषी भवन येथे दुपारी १२ वाजता जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत सभेच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अनेक विषयांवरून जिल्हा बँकेचे कौतुक करण्यात आले.सभागृहामध्ये अहवालाचे वाचन पूर्ण झाल्यानंतर सभा कामकाजाला सुरुवात झाली. माजी चेअरमन तथा भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी आमदार आणि बँकेचे माजी संचालक अ‍ॅड. अजित गोगटे यांची उपस्थिती लक्षणीय होती.यावेळी व्यासपीठावर बँक उपाध्यक्ष सुरेश दळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, संचालक विकास गावडे, अतुल काळसेकर, व्हिक्टर डान्टस, प्रमोद धुरी, गुरुनाथ पेडणेकर, नीता राणे, प्रज्ञा परब, अविनाश माणगांवकर, विकास सावंत, आत्माराम ओटवणेकर, आर. टी. मर्गज, विद्याधर बांदेकर, नितीन वाळके, गुलाबराव चव्हाण, राजन गावडे, शरद सावंत, प्रकाश मोर्ये, दिगंबर पाटील, प्रकाश गवस, जिल्हा दूध संघाचे जिल्हाध्यक्ष एम. के. गावडे, प्रसाद रेगे, पुरस्कार निवड समिती सदस्य डॉ. प्रसाद देवधर यांच्यासह सभासद संस्थांचे पदाधिकारी, सचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते.नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात मांडल्या विविध सूचनाबँकेने कर्जवसुलीबाबत चांगला निर्णय घेतला आहे. वसुलीही चांगली असल्याने नाबार्डच्या ह्यऑडिट अ वर्गह्णमध्ये या बँकेचा सातत्याने असलेला समावेश हा कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील लोकांना आर्थिक मदत करीत असताना शेतकरी, बागायतदार यांच्यासाठी केलेल्या विविध योजना, पशुउत्पादनांसाठी बँकेने सुरू केलेल्या योजना कौतुकास्पद असल्याचे मत सर्व सभासदांकडून मांडण्यात आले.मालवणचे नितीन वाळके यांनी अहवाल वाचनात आपल्या विविध प्रकारच्या सूचना केल्या. त्याची दखल संपूर्ण सभागृहाने घेतली. तसेच सहकारातील जाणकार वारंग, एम. के. गावडे आदींनी यावेळी मत व्यक्त केले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रsindhudurgसिंधुदुर्ग