शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवा-बाळा नांदगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 20:41 IST

मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देवागदे येथे मनसेचा मेळावा

कणकवली: मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचाराला आपण सर्वांनी बळ देणे गरजेचे आहे. शासन सर्व स्तरावर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मनसैनिकानी जनतेच्या मनात शासन विरोधातील नाराजी पोहचवली पाहिजे. वेळप्रसंगी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी कार्यकर्त्यानी ठेवावी. असे आवाहन मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केले.वागदे येथील एन.के. मंगल कार्यालयात रविवारी मनसेच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी मनसे नेते शिरीष सावंत, प्रदेश सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर , राज्य उपाध्यक्ष सत्यवान दळवी, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, अनिषा माजगावकर , जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, धीरज परब, चैताली भेंडे आदी उपस्थित होते.बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सर्व सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाची उभारणी केली .जनतेची कामे आताच्या शासनाकडून होत नसल्याने जनतेच्या मनात चीड आहे. अशावेळी मनसेकडे आशेने पाहिले जाते. याचा विचार करा आणि कामाला लागा.परशुराम उपरकर म्हणाले, राज्य व केंद्र शासनाने जनतेची घोर निराशा केली आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरलेले युती शासन आता पुन्हा युती करून जनतेसमोर निवडणुकीच्या माध्यमातून येणार आहेत. मात्र, जनता त्याना थारा देणार नाही. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदार, पालकमंत्री सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहेत. आतापर्यंत मनसेने त्यांच्यावर वचक ठेवला आहे. परंतु जनतेने मतदानाच्या माध्यमातून सत्ताधाऱ्याना त्यांचे अपयश दाखवून द्यावे.सत्यवान दळवी म्हणाले , महाराष्ट्रात रस्ते टोलमुक्त हवेत. अशी मागणी सर्वात प्रथम राज ठाकरे यांनी केली. मात्र, कोकणात होत असलेल्या महामार्गावर टोल नाके उभारणीचे काम सुरू आहे. त्यामुळे मनसैनिकानी आम्ही टोल भरणार नाही.अशी भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. आम्ही काम धंद्यानिमित्त मुंबईत असलो तरी कोकणवासीयांच्या प्रश्नासाठी कायमच तुमच्या सोबत आहोत.असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी उपस्थित अन्य पदाधिकाऱ्यानी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन राजन दाभोलकर यांनी केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBala Nandgaonkarबाळा नांदगावकर