शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

दर्याला श्रीफळ अर्पण करून मच्छिमार सज्ज

By admin | Updated: August 30, 2015 00:28 IST

सिंधुदुर्गात नारळी पौर्णिमा उत्साहात

मालवण : मालवण, देवगड, वेंगुर्ले किनारपट्टींसह जिल्ह्यात नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले सिंधुदुर्गावरून दर्याला मानाचा श्रीफळ अर्पण झाल्यानंतर मालवण बंदरजेटी येथे शहरातील मच्छिमार, व्यापारी आणि नागरिकांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. सावंतवाडी येथे ऐतिहासिक मोती तलावात, कुडाळ येथे भंगसाळ नदीत रिक्षा संघटनेने, कणकवली येथे गड नदीत पोलीस ठाण्याच्यावतीने श्रीफळ अर्पण करण्यात आले. मच्छिमार बांधवांनी दर्या राजाची पूजा करीत यावर्षी ‘मस्त्य हंगामात बरकत दे’, असे साकडे घातले. नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून शनिवारी दुपारी व्यापारी संघाच्यावतीने बाजारपेठेतील हनुमान मंदिरात श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडे घालण्यात आले. त्यानंतर व्यापारी संघाचा ‘नारळ’ ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे आणण्यात आला. या मिरवणुकीत मच्छिमार महिला पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर श्रीफळ व कलश घेऊन सहभागी झाल्या होत्या. सायंकाळी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण केले. त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्यावतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी सागराला श्रीफळ अर्पण केले. मालवणवासीयांनीही समुद्रात श्रीफळ अर्पण केले. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, मालवणचे पोलीस निरीक्षक विश्वजित बुलबुले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मंदार केणी, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, शिवसेना तालुकाप्रमुख बबन शिंदे, भाई गोवेकर, नंदू गवंडी, दीपक पाटकर, विजय केनवडेकर, बाळू अंधारी, नाना पारकर, स्वप्नाली नेरुरकर, लायन्स, लायनेस, रोटरी क्लब सदस्य, ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मालवण, मालवणातील मच्छिमार बांधव, व्यापारी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी) मच्छिमारबांधव मासेमारीसाठी सज्ज मासेमारी ही किनारपट्टीच्या अर्थकारणाचा कणा आहे. नारळी पौर्णिमेपासून नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करताना, बोटी समुद्रात लोटताना मच्छिमारबांधव दर्यास श्रीफळ अर्पण करून बरकतीची मागणी करतो. शासनाच्या नियमानुसार पूर्वी १० जून ते १५ आॅगस्ट किंवा नारळी पौर्णिमा हा मासेमारी बंदीचा कालावधी असायचा. मात्र, यावर्षी १ जून ते ३१ जुलै हा दोन महिन्यांचा कालावधी मासेमारी बंदीचा होता. त्यामुळे मासेमारी हंगाम १ आॅगस्ट पासून सुरू झाला असला, तरी बहुतांश मच्छिमारबांधव नारळी पौर्णिमेनंतरच नव्या मासेमारी हंगामास सुरुवात करणार आहेत. कबड्डी स्पर्धेचे आकर्षण नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून लायन्स व लायनेस क्लब यांच्यावतीने आयोजित महिला व पुरुष गटातील जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यांचे खास आकर्षण ठरले. वीज वितरण व भाजप यांच्यावतीने नागरिकांना अल्प दारात एलईडी बल्बची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, भाऊ सामंत, विजू केनवडेकर, गणेश कुशे, दादा वाघ, आपा लुडबे व अन्य उपस्थित होते. तसेच शिवसेनेच्यावतीने मालवणवासियांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. नारळ लढविण्यासाठी युवकांची गर्दी आजही नारळी पौर्णिमा उत्सवात बंदरजेटी येथे विविध ठिकाणांहून आणलेले नारळ लढविले जात होते. नारळ लढविण्याबरोबरच नारळी पौर्णिमा उत्सवाचा आनंद युवावर्गासह आबाल वृद्ध, महिला उपस्थित राहून लुटत होते. बंदर जेटीवर त्यामुळे भरगच्च गर्दी अनुभवता आली. मात्र, नारळाच्या किमतीत वाढ झाल्याने नारळी पौर्णिमेपूर्वी महिनाभर आधी नारळाच्या राशी टाकून नारळ लढविण्यात घट झाल्याचे प्रकर्षाने दिसून आले. (प्रतिनिधी)