शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine -सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे पासूनच्या लसीकरणासाठीची तयारी पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:23 IST

Corona vaccine Sindhudurg : कोरोना या वैश्विक महामारीला आळा घालण्यासाठी सध्या लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लसीकरण मोठ्या प्रामाणावर सुरू आहे. मात्र जिल्ह्याला आवश्यक असल्यापेक्षा कमी लस मिळत असल्याने. प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला लस देणे हे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनालाही अवघड होत आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात १ मे पासूनच्या लसीकरणासाठीची तयारी पूर्ण केवळ १८०० डोस शिल्लक, दोन दिवसांत अजून लस येणार

ओरोस : कोरोना या वैश्विक महामारीला आळा घालण्यासाठी सध्या लसीकरणाची मोहीम शासनाने हाती घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही लसीकरण मोठ्या प्रामाणावर सुरू आहे. मात्र जिल्ह्याला आवश्यक असल्यापेक्षा कमी लस मिळत असल्याने. प्रत्येक लाभार्थी व्यक्तीला लस देणे हे जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनालाही अवघड होत आहे.जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ १८०० एवढेच कोव्हॅक्सिनचे डोस शिल्लक असून, जिल्ह्यातील काही ठरावीक ठिकाणी ही लस देणे सुरु आहे. विशेषतः ज्यांचा कोव्हॅक्सिन या लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे. अशाच ठिकाणी ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.कोरोना या जागतिक महामारीची दुसरी लाट सध्या सुरू आहे. ही लाट पहिल्या लाटेपेक्षा अधिक धोकादायक आणि वेगाने पसरत आहे. त्यामुळे एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी लसीचा पर्याय शासनाने उपलब्ध केला आहे. शासनाने हे लसीकरण करण्यासाठी काही टप्पे निश्चित केले आहेत. आतापर्यंत या लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण झाले असून, आता पाचवा टप्पा सुरू करण्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे.सध्या ही लस ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना देण्यात येत आहे. यापूर्वी ही लस सर्वांनी घ्यावी यासाठी शासकीय अधिकाऱ्यांना जनतेने लस घ्यावी यासाठी विनवणी करावी लागत होती. मात्र, कोरोनाची दुसरी लाट सगळीकडे वेगात वाढू लागल्यावर ही लस घेण्यासाठी नागरिकांची चढ़ाओढ सुरु झाली आहे.दुसऱ्या डोसच्या ठिकाणी लस ठेवणारजिल्ह्याला आवश्यक असलेली लस आणि उपलब्ध लस यांचा मेळ बसत नाही. यामुळे सर्वांचे लसीकरण करणे अवघड होऊ लागले आहे. त्यातच आता १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला लस देण्याचे जाहीर केले आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला मोठ्या प्रामाणावर लस लागणार आहे.सद्यस्थितीत ४५ च्या वरील प्रत्येक व्यक्तींला लस देण्यासाठी सुमारे २ लाख डोसची आवश्यकता होती. अशावेळी केवळ २६ हजार एवढीच लस उपलब्ध झाली होती. यापैकी सद्यस्थितीत केवळ १८०० डोस एवढीच कोव्हॅक्सिन ही लस जिल्ह्यात शिल्ल्लक असून ही लस जिल्ह्यातील काही ठरावीक ठिकाणीच ज्या ठिकाणी या लसीचा दुसरा डोस देणे आवश्यक आहे अशा केंद्रांवर ठेवण्यात आली आहे.६ महिन्यांत लसीकरण पूर्ण व्हावे अशी तयारी : संदेश कांबळे१ मेपासून १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला लस देण्याचे शासनाने जाहीर केले आहे. यानुसार जिल्ह्यात आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे. जिल्ह्याला साधारण ६ ते साडेसहा लाख डोस एवढ्या लसीची आवश्यकता भासणार आहे. महिन्याला साधारण १ लाख व्यक्तिंना लस देता आली तर हे टार्गेट पुढील ६ महिन्यांत पूर्ण होऊ शकणार आहे. मात्र लसीच्या उपलब्धतेवर हे सर्व अवलंबून असल्याचे जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी सांगितले. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग