शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण, दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 13:21 IST

रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल, जादा गाड्या सोडण्याची मागणी

मालवण : दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर म्हणून ख्याती असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा यात्रोत्सव शनिवारी होत आहे. यावेळी दोन दिवस हा यात्रोत्सव असणार आहे. पहाटे ३ वाजल्यापासून एकूण ९ दर्शन रांगांद्वारे दर्शन घेता येणार आहे. मंदिर परिसरात व प्रशासनाकडून यात्रोत्सवाची तयारी गतिमानरीत्या सुरू आहे.आंगणे कुटुंबीय, आंगणेवाडी विकास मंडळ, शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणांकडून जत्रा सुरळीत पार पडण्यासाठी दक्षता घेतली जात आहे. गेली तीन वर्षे कोरोना साथ रोगामुळे जत्रा मर्यादित स्वरूपात साजरी करण्यात आली होती. यावर्षी मात्र निर्बंध मुक्त वातावरणात जत्रा होत असल्याने लाखो भाविकांची पावले आंगणेवाडीत वळणार आहेत.व्हीआयपी मार्ग अशी ओळख असलेला मसुरे आंगणेवाडी मार्गावरील दत्त घाटीमध्ये प्रथमच पथदीपांची व्यवस्था प्रथमच करण्यात आली आहे. त्यामुळे हा मार्ग अधिक सुरक्षित होणार आहे. देवालयालगत असलेले दोन ट्रान्सफॉर्मर शाळेच्या मागे एकाच ठिकाणी घेण्याच्या कामास प्रारंभ झाला असून यामुळे परिसर अधिक सुरक्षित होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे पोहोचणारे रस्ते दर्जा उन्नती करून प्राधान्याने पूर्ण केल्याने भाविक आभार मानत आहेत. जत्रेच्या दिवशी रात्री व्हीआयपी मार्गावरील मसुरे देऊळवाडा दत्त घाटी येथे होणारी वाहतूककोंडी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी जादा वाहतूक पोलिस याठिकाणी तैनात करणे आवश्यक आहे.जादा रेल्वे सोडण्याची मागणीआंगणेवाडी जत्रोत्सवास मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी कोकणात येतात. या चाकरमान्यांना जिल्ह्यात येण्यासाठी रेल्वेचा प्रवास अधिक सोईस्कर आहे. परंतु ४ फेब्रुवारी पूर्वी सर्व रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. काही गाड्यांचे वेटिंग तिकीट सुद्धा उपलब्ध नाही आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडण्याची मागणी चाकरमान्यांमधून होत आहे. एकूणच जत्रा पूर्व तयारीने बऱ्यापैकी वेग घेतला असून आंगणे ग्रामस्थ लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज होत असल्याचे चित्र आंगणेवाडीत दिसून येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग