शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत उभारण्यात येणाऱ्या अद्यावत भाजी मंडईचा आराखडा तयार : नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 18:08 IST

ही इमारत सहा मजली असणार आहेत यामध्ये 116 गाळे तर 115 ओटे असणार आहेत. यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आराखड्याला मंजुरी मिळतात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे.

सावंतवाडी : शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईची नव्याने उभारणी करण्यात येणार असून ही इमारत अद्यावत अशी सहा मजली असणार आहे. यासाठी तेरा कोटी रुपये खर्च अपेक्षित असून इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा आवश्यक त्या तांत्रिक मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी बुधवारी येथे दिली. या संकुलात गाळ्यासह पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली आहे असेही परब म्हणाले.ते सावंतवाडी नगरपालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, नगरसेवक आनंद नेवगी, सत्यवान बांदेकर बंटी पुरोहीत, अमित परब आदी उपस्थित होते.परब म्हणाले, सावंतवाडी शहराच्या दृष्टीने नगर पालिका प्रशासनाकडून एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. संत गाडगेबाबा भाजी मंडईची नव्या इमारतीचा आराखडा तयार आला आहे. यासाठी आवश्यक त्या तांत्रिक मंजुरीच्या सर्व बाबी पूर्ण करण्यात आल्या आहेत. तसा प्रस्ताव शासन स्तरावर पाठवण्यात आला आहे. ही इमारत सहा मजली असणार आहेत यामध्ये 116 गाळे तर 115 ओटे असणार आहेत. यासाठी तब्बल 13 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून आराखड्याला मंजुरी मिळतात त्यासाठीही पाठपुरावा केला जाणार आहे.सावंतवाडी नगरपालिकेला अग्निशामक बंबाची गरज होती तो बंब आता मिळाला असून आम्ही शासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक मंजुरी ही प्राप्त झाली आहे येणाऱ्या काळात त्यासाठी निधी मिळावा म्हणून शासनास कडे तसा प्रस्तावही तयार केला जाणार आहे असेही परब म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग