आचरा : आचरा येथील रामदेव ट्रेडर्सचे मालक हेमसिंह परमार यांची पत्नी कैलास कंवर परमार वय ३८ या गर्भवती महिलेचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री निधन झाले. अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी राजस्थानला नेण्यात आले.आचरा येथे व्यवसायासाठी आलेल्या हेमसिंह परमार यांची पत्नी कैलास कंवर या गेले काही दिवस आजारी होत्या. सुरूवातीला उपचारासाठी त्यांना मालवण येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचाराला प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांना कोल्हापूर येथे आठ दिवसांपूर्वी हलविण्यात आले होते.येथे त्या आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने उपचारात अडचणी येत होत्या.यातच त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती तीन मुली आणि दोन वषार्चा एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या निधनामुळे आचरा व्यापारयांनी शनिवारी दुपारी दुकाने बंद ठेवून त्यांना श्रद्धाजली अर्पण केली.
आचरा येथील गर्भवती महिलेचा तापाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:31 IST
आचरा येथील रामदेव ट्रेडर्सचे मालक हेमसिंह परमार यांची पत्नी कैलास कंवर परमार वय ३८ या गर्भवती महिलेचे कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री निधन झाले. अंत्यविधीसाठी त्यांचे पार्थिव त्यांच्या मुळ गावी राजस्थानला नेण्यात आले.
आचरा येथील गर्भवती महिलेचा तापाने मृत्यू
ठळक मुद्देआचरा येथील गर्भवती महिलेचा तापाने मृत्यू दुकाने बंद ठेवून श्रद्धाजली अर्पण