शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी अलर्ट राहावे!, कणकवलीत मान्सूनपूर्व नियोजन बैठक

By सुधीर राणे | Updated: May 9, 2023 13:15 IST

ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करा

कणकवली: लवकरच पावसाळा सुरू होणार आहे. नैसर्गिक आपत्तीत अॅपद्वारे पंचनामे करण्याच्या शासनाच्या सूचना असून त्यानुसार कार्यवाही होईल. संबंधित विभागांनी यासाठी अलर्ट असण्याची गरज आहे. तसेच अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या कालावधीत मुख्यालयात राहणे बंधनकारक असल्याची माहिती प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी बैठकीत दिली. तसेच अधिकाऱ्यांना विविध सूचनाही केल्या.कणकवली तहसील कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार आर. जे. पवार, पोलिस निरीक्षक अनिल जाधव, तालुका कृषी अधिकारी वैशाली मुळे, नगरपंचायत मुख्याधिकारी अवधूत तावडे, निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड आदी अधिकारी उपस्थित होते.प्रांताधिकारी कातकर म्हणाले, प्रत्येक विभागाने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची गरज आहे. तसेच तालुकास्तरीय आपत्ती निवारण कक्ष तहसील कार्यालयात कार्यान्वित करण्यात येणार आहे. पर्जन्यमानाची सद्यस्थितीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी होत आहे. तसेच याच दरम्यान पावसाचा अंदाज व्यक्त केला जातो. यावर्षी पाऊस लवकर येण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार सर्वांनी सतर्क रहावे.पूर, दरडीमुळे स्थलांतर करण्याची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. अशी ठिकाणे निश्चित करून त्यासाठीची पर्यायी व्यवस्था असावी. पर्यायी व्यवस्थेच्या ठिकाणी वीज, पाणी, स्वच्छतागृह असावे. नगरपंचायत स्तरावरही मान्सूनपूर्व कामांचे नियोजन करण्यात यावे. शहरातील गटारांची साफसफाई करण्यात यावी. झाडांच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे नियोजन  करावे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळणे व इतर रस्त्यांवर काही समस्या निर्माण झाल्यास यंत्रणा अलर्ट ठेवावी. महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा. ग्रामपंचायत स्तरावर आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात. टीसीएल पावडरबाबत दक्षता घ्यावी. शासकीय दवाखान्यांमध्ये औषधसाठा उपलब्ध ठेवावा. पोलिस विभागाने या कालावधीत अलर्ट असण्याची गरज आहे. तालुकास्तरीय पथके तयार करावीत, आदी सूचना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या.अतिवृष्टीच्या कालावधीत शाळेत जाणाऱ्या मुलांच्या ज्या मार्गावर पाणी येते तेथे आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. तसेच मोरी, रस्त्यांवर पाणी असताना वाहने घालू नयेत, याबाबत दक्षतेसाठी अलर्ट रहावे, असे स्पष्ट करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही अलर्ट राहण्याबाबातच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दुरुस्ती आवश्यक असलेल्या शाळांबाबतही कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या. ज्या यंत्रणा त्यांची जबाबदारी असताना व एक दोनवेळा सांगूनही उपस्थित राहत नसतील, तर संबंधितांवर गुन्हे दाखल करावे लागतील, असा इशाराही  दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस