शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार वैभव नाईकांना दिलासा, कनेडी राड्याप्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर

By सुधीर राणे | Updated: April 19, 2023 13:54 IST

माघी गणेश जयंतीची तयारी सुरू असताना कुणाल सावंत याला संदेश सावंत यांनी मारहाण केली

कणकवली: कणकवली तालुक्यातील सांगवे-कनेडी येथे झालेल्या राड्याप्रकरणी आमदार वैभव नाईक, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला. याप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल असलेल्या आमदार नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी ओरोस येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या तिघांचाही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी मंजूर केला आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी माघी गणेश जयंतीची तयारी सुरू असताना या गुन्ह्यातील एक आरोपी कुणाल सावंत याला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मारहाण केली. या झटापटीत गोट्या सावंत यांचा आयफोन चोरण्यात आला होता.  याप्रकरणी संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दाखल गुन्ह्यात आमदार वैभव नाईक, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक व नगरसेवक कन्हैया पारकर यांच्या सांगण्याने जमावाला उद्युक्त करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला व राडा घडविण्यासाठी या तिघांनी जमावाला उद्युक्त केले असे म्हटले होते.  तर या दरम्यान आमदार वैभव नाईक हातात दांडा घेऊन पोलिस व इतरांना धमकावण्याचा व भडकवण्याचा प्रयत्न करत होते. आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांनी जमावाला उद्युक्त केल्याने संदेश उर्फ गोट्या सावंत यांना जबर मारहाण करण्यात आली. त्यामुळे सावंत यांच्या छाती, पाय, हाताला गंभीर दुखापत झाली.  याबाबतच्या तक्रारीनुसार भादवि कलम ३०७, ३९२, ३२४, ३२३, १४७, १४३, १४८, १४९  अन्वये आमदार वैभव नाईक, सुशांत नाईक व कन्हैया पारकर यांच्या विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्याकडून याप्रकरणी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. जे. भारुका यांच्याकडे वकिलांमार्फत अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज करण्यात आला होता.  त्या अर्जावर सुनावणी होत या तिघांचाही जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. संशयित आरोपींच्यावतीने ऍड. उमेश सावंत यांनी युक्तीवाद केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक Courtन्यायालय