शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
4
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
5
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
6
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
7
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
8
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
9
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
10
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
11
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
12
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
13
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
14
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
15
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
16
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
17
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
18
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
19
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
20
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा

Sindhudurg: कोळंब येथील ग्रामसेवक मारहाण प्रकरणी पाच जणांना अटकपूर्व जामीन मंजूर

By सुधीर राणे | Updated: May 21, 2024 12:31 IST

कणकवली: मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार यांना कर्तव्यावर असताना कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कोळंब उपसरपंच ...

कणकवली: मालवण तालुक्यातील कोळंब येथील ग्रामसेवक प्रकाश विठ्ठल सुतार यांना कर्तव्यावर असताना कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, ग्रामपंचायत सदस्या संपदा प्रभू, संजना शेलटकर व नंदा बावकर व निखील विजय नेमळेकर यांना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड यांनी प्रत्येकी ५० हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामिन मंजूर केला. ३० एप्रिल २०२४ रोजी कोळंब ग्रामपंचायतीची तहकुब मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसेवक प्रकाश सुतार हे कक्षात निवडणूकीसंदर्भातील कामे करत असताना सकाळी १०.३५ वाजण्याच्या सुमारास उपसरपंच व तीन सदस्यानी त्यांना गेल्या सहा महिन्यापूर्वी दिलेल्या विकास कामांच्या मुद्द्यांबाबत आजच मासिक सभेत उत्तरे द्या, असे म्हणून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्यांना खर्चीवरून ढकलून खाली पाडले.या प्रकाराबाबत दुपारी १ वाजण्याच्या सुमारास अन्य ग्रामसेवकांना घेऊन मालवण येथील विस्तार अधिकारी यांच्या कार्यालयात असताना दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास निखील नेमळेकर याने आपल्या वडिलांबाबत तक्रार दिल्यास बघून घेईन अशी धमकी दिली. याबाबत सुतार यांनी मालवण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पाचही जणांविरूद्ध ३५३, ३३२, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.याबाबत संशियातांच्यावतीने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला. सुनावणीत त्याच दिवशी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास उपसरपंच व सदस्या हे ग्रामसेवकांच्या कक्षात गेलेले असताना ग्रामसेवकांनी त्यापैकी एका महिला सदस्याला अश्लिल शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी ग्रामसेवकाविरूद्ध मालवण पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच वरिल सदस्यांच्या तक्रारीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नेमलेल्या चौकशीत ग्रामसेवक व सरपंच यांना दोषी धरून अपहारीत रक्कम वसूलीचे शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिले होते, हे निदर्शनास आणून देण्यात आले.

सुनावणीअंती न्यायालयाने प्रत्येकी ५० हजाराचा अटकपूर्व जामिन मंजूर करतानाच मालवण पोलिस ठाण्यात सोमवार व गुरूवारी हजेरी लावणे, सरकारी पक्षाच्या पुराव्यात ढवळाढवळ न करणे आदी अटी घातल्या आहेत.सर्व संशयितांच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCourtन्यायालय