शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 16:23 IST

pratap sarnaik, narayanrane, sindhudurg, shivsena शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत ! : नारायण राणे ईडीच्या छापे, राणे यांची प्रतिक्रिया देण्यास नकार

कणकवली : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत . कणकवली येथे दौऱ्यावर असलेल्या माजी मुख्यमंत्री भाजप खासदार नारायण राणे यांनी याबाबत सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मात्र प्रताप सरनाईक काही साधू संत नाहीत , असा टोला त्यांनी लगावला आहे.नारायण राणे यांच्या ' जन संवाद ' कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी कणकवली येथील संपर्क कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते म्हणाले, कायदेशीर गोष्टींमध्ये चौकशी होईपर्यंत प्रतिक्रिया द्यायची नसते . ईडी , सीबीआय , कोर्टाचे निर्णय यांच्या चौकशा पूर्ण झाल्याशिवाय आपण भाष्य करायचे नसते .

प्रताप सरनाईक काय साधू संत नाहीत . तुम्ही आधी त्यांची माहिती घ्यावी . ईडीचा छापा पडला , हे योग्य की अयोग्य ते तुम्ही सांगा , मग आम्ही प्रतिक्रिया देऊ ह्व असे नारायण राणे यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले .

हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे ! : नारायण राणे यांची टीकासिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. मात्र, त्यावर मात करण्यासाठी कोणतीही परिणामकारक व्यवस्था नसल्याने मृत्यू होणाऱ्या व्यक्तींच्या संख्येतही वाढ होत आहे. याला जबाबदार ठाकरे सरकार आहे. हे सरकार कोणाची देणी तसेच मानधनही देत नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत असून हे फक्त मातोश्रीच्या पिंजऱ्यातले सरकार आहे. अशी टीका माजी मुख्यमंत्री, भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केली आहे.कणकवली येथील संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले , जिल्हा नियोजन सभेत झालेल्या निर्णयानंतर परस्पर कामे बदलणे हा पालकमंत्री यांचा अधिकार नाही. पालकमंत्री हा फक्त त्या सभेचा अध्यक्ष असतो. कामे बदलायची असतील तर मतदान घ्यावे लागते. त्यावेळी बहुसंख्येने ठराव मंजूर झाल्यास ते काम जिल्हा नियोजन मधून घ्यायचे असते.मात्र, ते न करता सभा संपल्यानंतर परस्पर कामे बदलून आपल्या पक्षातील लोकांची कामे करायची, हे नको ते उद्योग पालकमंत्री करत आहेत. हे योग्य नव्हे.        सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. औषधे तसेच डॉक्टर नाहीत. इतर सुविधांची वानवा आहे. राज्यातही अशीच स्थिती आहे. त्यामुळे जर कोरोनामुळे जिल्ह्यासह राज्यात कोणाचा मृत्यू झाला. तर त्याला जबाबदार हे ठाकरे सरकारच आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याची विकासाच्या आणि आरोग्याच्याबाबतीत दयनीय अवस्था झाली आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ही बाब आपण तुमच्यासमोर मांडत आहे.ठाकरे सरकार हे फक्त कर्ज माफी बाबत बोलत आहे. मात्र, त्याबाबत काहीच ठोस असे झालेले नाही. हे सरकार कोणाची देणी व मानधन देत नाही . मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडत नाहीत. तसेच कोणताही लोकोपयोगी आदेश किंवा निर्णय सरकार घेत नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला.सरकारच जबाबदार राहील !शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक , संबंधित कर्मचारी यांच्या कोरोना चाचण्या झाल्या पाहिजेत. त्या न करता शाळा सुरू केल्या आणि जर उद्या काही झाले तर त्याला सरकारच जबाबदार असेल.असे राणे यावेळी म्हणाले. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकNarayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना