शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

केसरकरांवर स्तुतिसुमने, साळगावकरांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 19:22 IST

Sawantwadi News- भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केसरकर यांना चांगलेच गोंजारत स्तुतिसुमने उधळली, तर तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यामुळे सावंतवाडीतील विकासकामे रखडली, असे सांगत चांगलेच फटकारले. चव्हाण यांच्या बदललेल्या पवित्र्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.

ठळक मुद्देकेसरकरांवर स्तुतिसुमने, साळगावकरांना फटकारले निधीसाठी माझ्यासह केसरकरांनी पाठपुरावा केला

सावंतवाडी : सावंतवाडीतील विकासकामांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो निधी दिला त्यासाठी मी व आमदार दीपक केसरकर यांनी प्रयत्न केले. त्यामुळेच मोठा निधी या जिल्ह्यासाठी येऊ शकला. महाविकास आघाडी सरकारने केसरकर यांनी आणलेली चांदा ते बांदा योजना बंद करून विकासाला खो घातला आहे, अशी टीका भाजप नेते माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. यावेळी त्यांनी केसरकर यांना चांगलेच गोंजारत स्तुतिसुमने उधळली, तर तत्कालीन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यामुळे सावंतवाडीतील विकासकामे रखडली, असे सांगत चांगलेच फटकारले. चव्हाण यांच्या बदललेल्या पवित्र्याने सर्वजण अवाक्‌ झाले होते.बुधवारी सावंतवाडी नगरपालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन तसेच लोकार्पण पार पडले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष संजू परब, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगांवकर, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, उदय नाईक, परिमल नाईक, उत्कर्षा सासोलकर, दीपाली भालेकर, समृद्धी विर्नोडकर, मनोज नाईक, उपसभापती शीतल राऊळ, युवक अध्यक्ष आनंद सावंत आदी उपस्थित होते.

नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकासाबाबत शब्द दिला तो आम्ही पूर्ण करणार, असे परब यांनी सांगितले. यावेळी बॅ. नाथ पै बहुउद्देशीय सभागृह दर्जावाढ तसेच जनरल जगन्नाथराव भोसले उद्यानात शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाची माहिती देण्यात आली. यावेळी सावंतवाडी शहरातील तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.निधीसाठी माझ्यासह केसरकरांनी पाठपुरावा केलामाजी मंत्री चव्हाण म्हणाले, मुंबईत हक्कभंग समितीची बैठक आहे. या बैठकीला मला जायचे होते. पण नगराध्यक्षांनी केलेली विकासकामे पण तेवढीच महत्त्वाची होती. त्यामुळे त्या बैठकीला गेलो नाही. आमदार दीपक केसरकर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे ते या कार्यक्रमाला आले नसावेत, असे चव्हाण यांनी सांगितले. पण तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोकणच्या विकासासाठी निधी मिळावा म्हणून सतत पाठपुरावा करणारे मी व केसरकर होतो. 

टॅग्स :SawantwadiसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर BJPभाजपाministerमंत्रीsindhudurgसिंधुदुर्ग