शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पद असो अथवा नसो ,जनसेवेचे व्रत कधीही सोडणार नाही : संदेश पारकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 11:06 IST

Sandeshparkar Sindhudurg : माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये अनेक चढ-उत्तार पाहिले. त्याचप्रमाणे अनेक आव्हानांचा सामना करताना दहशतही अनुभवली. पण कधीही मनाने खचलो नाही. तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो.त्यामुळे विरोधकांना पुरून उरलो. पद असो अथवा नसो, जनसेवेचे घेतलेले व्रत कधीही सोडणार नाही.असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले.

ठळक मुद्देपद असो अथवा नसो ,जनसेवेचे व्रत कधीही सोडणार नाही : संदेश पारकरकणकवलीत कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रम

कणकवली: माझ्या ३५ वर्षांच्या राजकीय कारकीर्दमध्ये अनेक चढ-उत्तार पाहिले. त्याचप्रमाणे अनेक आव्हानांचा सामना करताना दहशतही अनुभवली. पण कधीही मनाने खचलो नाही. तर जनतेच्या हितासाठी व जिल्ह्याच्या विकासाकरिता अविरतपणे काम करत राहिलो.त्यामुळे विरोधकांना पुरून उरलो. पद असो अथवा नसो, जनसेवेचे घेतलेले व्रत कधीही सोडणार नाही.असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते संदेश पारकर यांनी केले.कणकवली येथील मातोश्री मंगल कार्यालय येथे आयोजित कोरोना योद्धा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख गितेश कडू, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत,सुशांत नाईक,कन्हैया पारकर,नीलम सावंत,संदेश सावंत- पटेल,अवधूत मालणकर , राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस रुपेश जाधव आदी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, कॉंग्रेस विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून माझी राजकीय इनिंग सुरू झाली. जिल्ह्यातील राजकीय दहशतवादाविरोधात लढा दिल्यामुळे माझी राज्यभर ओळख निर्माण झाली. राजकीय प्रवासात मी काही चुकीचे निर्णय घेतले.त्यातून माझे मोठे नुकसान झाले. हे मला मान्य आहे. पण मी ज्या पक्षात असतो त्या पक्षाचे काम प्रामाणिपणे करतो. समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून आपण सामाजिक कार्य करीत आहे. त्यामुळे जनतेशी माझी नाळ जुळली आहे.जनतेचे माझ्यावर असलेले प्रेम व आशीर्वाद हे माझ्यासाठी सर्वोच्च पद आहे. आतापर्यंत अनेक आव्हाने पेलली, दहशत, भीतीही अनुभवली, काही चुकीच्या निर्णयांमुळे मित्रही गमावले ते दुसर्‍या पक्षात जाऊन मोठे झाले. पण त्यांच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही कटुता नाही. त्यांची उत्तरोतर प्रगती होत राहो,अशा शुभेच्छाही पारकर यांनी यावेळी दिल्या. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग