शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर झुक्या भाऊची भाकीते होताहेत लोकप्रिय, युवावर्गाची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 14:46 IST

तुम्हांला तुमचे भविष्य जाणून घ्यायचेय? तर मग आता कोणा ज्योतिषाकडे जायची गरज नाही. कारण सोशल मीडियावर भविष्यवाणी करणाऱ्या झुक्या भाऊने युवावर्गासह अनेकांना वेड लावले आहे. सुशिक्षित लोकही झुक्या भाऊने वर्तविलेले भाकीत तंतोतंत खरे असल्याचा दावा करीत आहेत. फेसबुकशी कनेक्ट असलेल्या युजर्सना सापडलेला झुक्या भाऊ युवावर्गामध्ये मनोरंजनाचे साधन बनलाय.

ठळक मुद्देफेसबुकवर झुक्या भाऊची भाकीते होताहेत लोकप्रिय, युवावर्गाची पसंती फेसबुकवर झुक्याची भविष्यवाणी ठरतेय चर्चेचा विषय

मालवण : तुम्हांला तुमचे भविष्य जाणून घ्यायचेय? तर मग आता कोणा ज्योतिषाकडे जायची गरज नाही. कारण सोशल मीडियावर भविष्यवाणी करणाऱ्या झुक्या भाऊने युवावर्गासह अनेकांना वेड लावले आहे. सुशिक्षित लोकही झुक्या भाऊने वर्तविलेले भाकीत तंतोतंत खरे असल्याचा दावा करीत आहेत. फेसबुकशी कनेक्ट असलेल्या युजर्सना सापडलेला झुक्या भाऊ युवावर्गामध्ये मनोरंजनाचे साधन बनलाय.फेसबुक अकाऊंट असलेल्या व्यक्तींना फेसबुक पेजवर हा झुक्या भाऊ भेटतो. तुमच्या खाण्या-पिण्यापासून ते आवडी-निवडीपर्यंतची झुक्या भाऊ काही क्षणात माहिती देतो. त्याने दिलेली माहिती तंतोतंत खरी जाणवायला लागली की काही रसिक तत्काळ पोस्ट करून झुक्या भाऊला धन्यवाद देतात.

गेल्या महिन्याभरात या झुक्या भाऊने फेसबुकवर धुमाकूळ घातला आहे. आपण पुरोगामी असलो तरी झुक्याचे आपल्या विषयीचे मत पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. हा एक अंधश्रद्धेचा भाग असला तरी आजची सोशल पिढी याकडे टाईमपास म्हणून पहात आहे.फेसबुक अकाऊंटवर कोणीतरी शेअर केलेली झुक्या भाऊच्या नावाने पोस्ट येते. त्यात एकापेक्षा एक असे आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न असतात. आपल्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांवर क्लिक केल्यास हाच झुक्या भाऊ एका क्षणात माहिती देतो. काहीवेळा आपल्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी झुक्या भाऊने जाहीर केल्यावर आपल्याशा वाटू लागतात.

विद्यार्थीदशेपासून शिक्षकीपेशापर्यंत झुक्या भाऊची क्रेझ आहे. झुक्या भाऊची जगजाहीर भविष्यवाणी रंजकता आणणारी आहे. झुक्या भाऊने दिलेले ह्यत्याह्ण प्रश्नाचे उत्तर आपल्या बाजूने असेल तर मग त्याचे जाहीर आभार मानले जातात. झुक्या भाऊची कौल देणारी ज्योतिषी युवावर्गात चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे.झुक्याची राजकीय भविष्यवाणीझुक्या भाऊ फेसबुकवर लोकप्रिय होत असताना तो माणसांच्या स्वभावाप्रमाणे आता कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या रणसंग्रामावर लक्ष ठेवून आहे. कणकवलीचा नगराध्यक्ष कोण होणार? याचे भाकीतही झुक्या भाऊने वर्तविले आहे. फेसबुकवर झुक्याचे कनेक्शन काय आहे? याचा सुगावा लागला नसला तर मल्लू अ‍ॅप डॉट नेट या वेबसाईटवरून अनेकांच्या जीवनाशी निगडित प्रश्नाचा झुक्या भाऊ वेध घेता घेता लोकप्रिय होतो आहे....या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो झुक्या भाऊ

  1. तुम्ही आयपीएलमध्ये कोणत्या संघाला पाठिंबा देता?
  2. तुम्हांला कोणत्या नावाने हाक मारलेली आवडेल?
  3. गावात तुम्हांला इज्जत किती आहे?
  4. सदैव तुमच्या पाठीशी कोण असेल?
  5. तुमचे लग्न कोणत्या प्रकारे होईल?
  6. तुमच्या यशाचे गमक काय?
  7. कोकणातले तुमचे आवडते ठिकाण कोणते?
  8. तुमच्या सर्व इच्छा कोण पूर्ण करू शकतो?
  9. तुमचे लग्न कधी होईल?
  10. भविष्यात तुम्हांला कुठल्या कर्तृत्वाने ओळखतील?
  11. लोक तुम्हांला काय समजतात?
  12. तुम्ही सगळ्यात जास्त कोणाला मानता?
  13. तुमच्या मनात काय चालू आहे?
  14. तुम्ही प्रेमात किती जणांना फसवले?
  15. तुमचे व्यक्तिमत्त्व कसे आहे? 
  16. तुम्ही राजकारणात कोणत्या पदावर जाल?
  17. झुक्या भाऊचा प्रेमाविषयी सल्ला!
  18. झुक्या भाऊकडून जाणून घ्या तुमचा स्वभाव!

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFacebookफेसबुक