शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाधवडे-वारगाव रस्त्याचे निकृष्ट काम शिडवणे ग्रामस्थांनी पाडले बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2018 21:20 IST

नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले.

वैभववाडी(सिंधुदुर्ग): नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या निकृष्ट नूतनीकरणाचे 1 कोटी 4 लाखांचे काम शिडवणे ग्रामस्थांनी दुपारी बंद पाडले. त्यानंतर डांबर न टाकताच पसरलेली खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा ती खडी पसरविण्यास पोटमक्तेदारास भाग पाडले. या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, या कामाचा मक्ता कणकवली तालुक्यातील ठेकेदाराच्या नावे असून, त्यापैकी बंद पाडलेले 2 किलोमीटरचे काम वैभववाडीतील ठेकेदार करीत आहे. त्यामुळे या निकृष्ट कामाबाबत जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.नाधवडे-शिडवणे- वारगाव रस्त्याच्या 4 किलोमीटर नूतनीकरणासाठी 1 कोटी 4 लाख रुपयांची तांत्रिक मंजूर मान्यता आहे. या कामाचा मुख्य ठेकेदार कणकवली तालुक्यातील असून 2 किलोमीटरचे काम करूळचे अनिल पाटील करीत आहेत. पाटील यांनी नाधवडेत नापणे धबधब्याकडे जाणा-या फाट्यापासून नूतनीकरण सुरू केले आहे. दुपारी शिडवणेतील दीपक पांचाळ, शिवसेना उपविभाग प्रमुख दयानंद कुडतरकर, सदानंद टक्के, विनोद कोकाटे, आबा टक्के आदी ग्रामस्थ काम सुरू असलेल्या ठिकाणी दाखल झाले. काम योग्य पद्धतीने सुरू नसल्याचा संशय आला.शिडवणे ग्रामस्थांनी पसरलेली खडी पायाने विस्कटून पाहिली तेव्हा खाली डांबर आढळले नाही. त्यामुळे आणखी 3-4 ठिकाणी खडी विस्कटल्यावर रस्त्यावर डांबरच टाकले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी निकृष्ट काम बंद पाडले. काम बंद पाडल्याचे समजताच काही वेळात पोटमक्तेदार अनिल पाटील कामाच्या ठिकाणी पोहोचले. त्यावेळी शिडवणे ग्रामस्थांनी पाटील यांना निकृष्ट कामाबाबत जाब विचारत रस्त्यावर पसरलेली संपूर्ण खडी बाजूला करून डांबर मारायला भाग पाडले. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे सुमारे 100 मीटरवर पसरलेली संपूर्ण खडी बाजूला करून रस्त्यावर डांबर मारून पुन्हा खडी पसरविण्यास सुरुवात केली. त्यामुळे शिडवणेतील काही ग्रामस्थ उशिरापर्यंत कामावर लक्ष ठेवून तेथेच थांबले होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कामाकडे अजिबात लक्ष नसल्यामुळे त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या निकृष्ट कामाबाबत जिल्हा प्रशासन कोणते पाऊल उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.सुट्टीच्या दिवशी पोटमक्तेदाराने नूतनीकरणाचे काम सुरू केले. त्यामुळे कामावर देखरेख करण्यासाठी अधिकारी किंवा खुद्द मक्तेदारही हजर नव्हता. अशा परिस्थितीत केवळ मजूर या रस्त्याचे काम करीत होते. या प्रकाराबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी प्रदीप व्हटकर व शाखा अभियंता शैलेश मोरजकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. परंतु दोन्ही अधिका-यांनी प्रतिसाद दिला नाही.ठेकेदार चांगला असं ऐकून होतो, पण...या मार्गाने जात असताना  काम सुरू असलेले पाहिले. तेव्हा आम्हाला संशय आला. त्यामुळे आम्ही गावातील लोकांना बोलावून घेऊन पसरलेली खडी विस्कटून पाहिली त्यावेळी डांबर घातले नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे संपूर्ण खडी बाजूला करून पुन्हा डांबर मारायला लावले आहे. चांगला ठेकेदार म्हणून नाव ऐकून होतो पण परिस्थिती गंभीर आहे. शासन जनतेच्या सुविधेसाठी पैसे देते. निकृष्ट कामे करून पोटं भरण्यासाठी नव्हे, अशी प्रतिक्रिया शिडवणेचे दीपक पांचाळ यांनी व्यक्त केली.मजुरांनी चूक केली- अनिल पाटीलया रस्त्याचे 4 किलोमीटरचे काम मंजूर असून, त्यापैकी 2 किलोमीटरचे काम माझ्याकडे आहे. कामाची सुरुवात करून देऊन मी गेलो. त्यानंतर मजुरांनी चुकीच्या पद्धतीने खडी पसरली होती. शिडवणे ग्रामस्थ आल्याचे समजताच मी आलो. आता संपूर्ण खडी बाजूला करून पुन्हा व्यवस्थितपणे करीत आहोत, असे पोटमक्तेदार अनिल पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :vaibhavwadiवैभववाडी