शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

“प्लाय् ९१” विमान कंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा सुरु, सिंधुदुर्ग विमानतळावरून ७५ सीट असलेल पहिलं विमान रवाना 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 18, 2024 16:13 IST

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग विमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान ...

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गविमानतळावरून “प्लाय् ९१” विमानकंपनीची सिंधुदुर्ग ते बंगळुरू सेवा आजपासून सुरु झाली. ७५ सीट असलेल पहिल विमान आज सोमवारी १.१५ मिनिटांनी सुटले. या नूतन सेवेचे उद्घाटन माजी सभापती निलेश सामंत, प्लाय् ९१ कंपनीचे व्यवस्थापक मनोज चाको, आशुतोष चिटणीस, आय.आर बि. कंपनीच कुलदीपसिंग, परूळेबाजार सरपंच प्रणिती आंबडपालकर, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, प्रसाद पाटकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सिंधुदुर्ग विमानतळावरून फ्लाय ९१ ही विमान कंपनीने पहिल्या टप्यात हैद्राबाद व बंगळूरू अशी सेवा सुरु करत आहे. या विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नुकतीच प्रवाशी वाहतूकीची परवानगी दिली आहे. २ मार्च रोजी गोवा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळा वरुण बंगळूर कडे विमावाने उड्डाण करून शुभारंभ केला आहे. व्यावसायिक उड्डाणासाठी जी, परवानगी आवश्यक असते ती कंपनीला एप्रिल २०२३ मध्येच मिळाली आहे.नवीन विमान कंपनी ही मूळची गोव्यातील आहे. कंपनीने परवानगीच्या सर्व परिक्षा दिल्या आहेत व पूर्ण केल्या आहेत. शासनाच्या उडाण योजनेत काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. यात महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड, सह सिंधुदुर्गचाही समावेश आहे. त्यामुळे आज पासून सिंधदुर्ग विमानतळावरुन सेवा सुरू झाली आहे. तसेच हि कंपनी पर्यटकांसाठीही विशेष विमानसेवा चालवणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. अशाच प्रकारे विमान कंपनीची नियमित सिंधुदुर्ग विमानतळावरून सेवा सुरू झाल्यानंतर या विमानतळाचे महत्त्व अजून वाढणार आहे.सिंधुदुर्ग ते बंगळुरू प्रवास करा फक्त १९९१/- रुपयात bharat unbond या अंतर्गत कनेक्टिंग बंगळुरू, गोवा, हैद्राबाद, सिंधुदुर्ग अशी टॅग लाईन या विमान कंपनीने केली आहे. दरम्यान गेले काही महिने सिंधुदुर्ग विमानतळावरून चांगली विमान सेवा मिळत नाही या कारणाने प्रवाशांची नाराजी होती. मात्र या नव्या कंपनीच्या विमानसेवेमुळे पुन्हा एकदा प्रवासी या विमानतळाशी जोडले जाणार आहेत. आजच्या या उद्घाटन वेळी प्रकाश राणे, बाळा राऊळ, उपसरपंच संजय दुधवडकर, राणे, करलकर, आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गairplaneविमान