शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्यासाठी करताहेत पायपीट, ऐन पावसाळ्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:10 IST

ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे पिण्याच्या पाण्यासाठी करताहेत पायपीट, ऐन पावसाळ्यातील प्रकार कुडासेमधील नळपाणी योजना पंधरा दिवस बंद

दोडामार्ग : कुडासे गावातील चार वाड्यांवरील सुमारे दीडशे कुटुंबांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून नादुरुस्त आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. मात्र, नळपाणी योजना स्वत: चालविणारे ग्रामपंचायत सदस्य अजय परब निर्धास्त आहेत. ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे.येथील देसाईवाडी, वानोशीवाडी, धनगरवाडी, खैरातवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करणारी नळपाणी योजना चतुर्थीपूर्वीच नादुरुस्त झाली आहे. सुमारे दीडशे कुटुंबे या पाणी योजनेवर अवलंबून आहेत. मात्र, गेले पंधरा दिवस येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी ऐन पावसाळ्यात दोन किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. ही नळपाणी योजना ग्रामपंचायतीच्या ताब्यात नसून ती पाणीपुरवठा व्यवस्थापन समितीकडे आहे.मात्र, ग्रामपंचायत सदस्य अजय परब हे वैयक्तिकरित्या ही नळपाणी योजना चालवितात. पाणीपट्टी वसुलीपासून ते देखभाल दुरुस्तीपर्यंत ते स्वत: करीत आहेत. मात्र, त्याचा हिशोब अद्यापपर्यंत ग्रामपंचायत वा पाणीपुरवठा समितीला त्यांनी दिलेला नाही.कुडासे गावातील नळपाणी योजना गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून उत्सवाच्या कालावधीतच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर आहे.ऐन पावसाळ्यात एकीकडे पूर येतोय तर दुसरीकडे पिण्याचे पाणी मिळत नाही. याला काय म्हणायचे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चतुर्थीपूर्वी नादुरुस्त झालेली नळपाणी योजना दुरुस्त करून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणे अत्यावश्यक होते. परंतु याकडे परब यांनी दुर्लक्ष केले.

परिणामी ग्रामस्थांना अद्यापही पिण्याच्या पाण्यासाठी दोन किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागत आहे. ही बाब खेदजनक असल्याची खंत ग्रामस्थ संतोष देसाई, उल्हास देसाई, बाजीराव देसाई यांसह अन्य ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :water shortageपाणीकपातsindhudurgसिंधुदुर्ग